आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातालुक्यातील ग्रामीण भागातील पाणीटंचाई निवारणार्थ पंचायत समितीच्या वतीने संभाव्य पाणीटंचाई कृती आराखडा तयार करत वरिष्ठ कार्यालयाकडे सादर करण्यात आला.
यंदा कडक उन्हाळा असून, काही गावात नागरिकांना पाणीटंचाई भेडसावू शकते. यंदा चांगल्या पावसामुळे सर्व प्रकल्पात पुरेसा पाणीसाठा झाला. त्यामुळे काही गावे वगळता पाणीटंचाई भासणार नाही. परंतु भर उन्हाळ्यात तलाव, विहिरींच्या पाण्याचे बाष्पीभवन होऊन पातळीत घट होते. त्यामुळे काही गावांना टंचाईच्या झळा बसण्याची शक्यता असल्याने पंचायत समिती प्रशासनाने दोन टप्प्यात संभाव्य पाणीटंचाई कृती आराखडा तयार केला आहे. पहिला टप्पा ३१ मार्च अखेरपर्यंत कृती आराखड्यात खर्चाची तरतूद केली नाही. १ एप्रिल ते ३० जूनपर्यंत दुसरा टप्पा आहे. या कृती अराखड्यात सार्वजनीक पाणीपुरवठा विहिरीतील गाळ काढणे, खासगी विहीरी व विंधन विहिरींचे अधिग्रहण, नळ योजनेची दुरुस्ती, नवीन विहीरी घेणे, तात्पुरत्या पूरक नळ योजना घेणे आदी कामांचा समावेश आहे.
एक एप्रिल ते ३० जूनदरम्यान दुसरा टप्पा
दुसऱ्या टप्प्यातील १ एप्रिल ते ३० जून दरम्यानच्या संभाव्य पाणीटंचाई कृती अराखड्यासाठी १० लाख ९८ हजारांची तरतूद केली आहे. यात खासगी विहिरी/विंधन विहिरींचे अधिग्रहणासाठी तालुक्यातील १४ गावांचा समावेश केला आहे. यात टँकरने पाणी पुरवठ्यासाठी कात्राबादचा समावेश केला. अधिग्रहणासाठी धोत्री २, कंडारी २, कात्राबाद १, जामगाव १, कुंभेजा १,वानेवाडी १, मुगाव १, शिरगीरवाडी १, राजूरी १,रोहकल १, साकत ( बु ) १,लोणारवाडी १, टाकळी १, देवगाव ( खु ) १ आदी गावांचा समावेश आहे.
टंचाई निर्माण झाल्यास उपाययोजना
आगामी काळात तालुक्यातील ग्रामीण भागात पाणीटंचाई निर्माण झाल्यास उपाययोजनांकरिता आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल. तसेच दुसऱ्या टप्प्यासाठी १० लाख ९८ हजार रुपयांचा पाणीटंचाई निवारण करण्यासाठी कृती आराखडा वरिष्ठ कार्यालयात पाठवला आहे.
- डॉ. अमित कदम, गटविकास अधिकारी, परंडा.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.