आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गैरसोय:समर्थनगर वगळता शहरात दोन दिवसांआड पाणीपुरवठा

उस्मानाबाद3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील नागरिकांना एक महिना पाणी पुरवठ्याच्या गैरसोयीचा सामना करावा लागला होता. मात्र, आता समर्थ नगर वगळता अन्य सर्व भागात दोन दिवसांआड म्हणजे तिसऱ्या दिवशी नियमित पाणी पुरवठा होत आहे. त्यामुळे पाण्याची चिंता मिटली आहे. जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात उजनी येथील पंप हाऊसच्या सब स्टेशनचे केबल बदलण्याचे काम करण्यात येत होते. त्यामुळे पाणी पुरवठा करण्यास अडचणी येत होत्या. पाणी पुरवठा अधिकाऱ्यांनी तेथे ठिय्या मारून कामही करुन घेतले होते. १५ ते २० दिवसांचा अवधी लागला. त्यामुळे पाणी पुरवठा काही भागात तीन तर काही भागात चार दिवसांवर आला होता. मात्र, आता पुरवठा सर्व शहरात सुरळीत झाला आहे. दुसरीकडे समर्थ नगरच्या जलकुंभाचे काम सुरु असून त्यांना एकदाच पाणी पुरवठा करणे शक्य होत आहे. त्यामुळे आठवड्यातून केवळ एकदाच त्यांना पाणी मिळते. या भागात चार दिवसांनी पुरवठा करण्यात येत असल्याची माहिती पाणी पुरवठा विभागातील अधिकाऱ्यांकडून मिळाली.

बातम्या आणखी आहेत...