आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाणीपुरवठा:मनमाडला आता 19 दिवसांआड पाणीपुरवठा ; ग्रॅव्हिटीने जलशुद्धीकरण केंद्रात येत नाही

मनमाड22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहराला सध्या सुरू असलेला १४ दिवसांआड पाणीपुरवठा आता १९ दिवसांआड झाला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या वाघदर्डी धरणातील पाणीसाठ्याने तळ गाठला आहे. यामुळे धरणातील पाणी ग्रॅव्हिटीने जलशुद्धीकरण केंद्रात येत नाही. तेथे ३० व १० अश्वशक्तीचे असे दोन वीजपंप बसविण्यात आले असून जलशुद्धीकरण केंद्रात त्याद्वारे पाणी घेण्यात येत आहे. परंतु सध्या सुरू असलेल्या वादळी वाऱ्यामुळे व पावसामुळे वीजपुरवठा वारंवार खंडित होत आहे. त्यामुळे वीजपंपाद्वारे जलशुद्धीकरण केंद्रात वेळेवर, पुरेसे पाणी उपलब्ध होत नाही व जलशुद्धीकरण प्रक्रिया पूर्ण करता येत नाही. त्याचा परिणाम शहरातील पाण्याच्या वितरणावर झाला आहे. त्यातच पालखेड डाव्या कालव्याचे आवर्तन आता २५ जूननंतर मिळणार असल्याचे अधिकृतरित्या कळविण्यात आले आहे. त्यामुळे हे पाणी वाघदर्डी धरणात पोहोचण्यास १ जुलै उजाडेल अशी सध्याची परिस्थिती आहे. या सर्व परिस्थितीमुळे सध्याचा १४ दिवसांआड पुरवठा आता १९ दिवसांवर गेला आहे. उशिरा पाणीपुरवठ्यामुळे होणाऱ्या गैरसोयीबद्दल नगरपालिकेतर्फे दिलगिरी व्यक्त करण्यात येत असल्याचे पत्रक प्रसिद्धीस देण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...