आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Aurangabad
  • Osmanabad
  • Weather Update Temperature Increase| Dharashiv Weather Update94 पैकी 36 दिवस ढगाळ हवामानाचे; जिल्ह्यात फक्त 58 दिवस कडक ऊन‎, 11 ते 20 मे दरम्यान उच्चांकी तापमान‎

तापमान:94 पैकी 36 दिवस ढगाळ हवामानाचे; जिल्ह्यात फक्त 58 दिवस कडक ऊन‎, 11 ते 20 मे दरम्यान उच्चांकी तापमान‎

धाराशिव24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • आणखी २ दिवस अवकाळीचा अंदाज, शुक्रवारी दिवसभर पावसाळी स्थिती, पिकांवर वितपिरत परिणाम‎

धाराशिव जिल्ह्यात यावर्षी उन्हाळ्यात पावसाळ्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे फेब्रुवारीपासून‎ आजपर्यंत उन्हाळ्यातील ९४ दिवसांत‎ तब्बल ३६ दिवस पावसाचे तसेच अंशत:‎ ढगाळ वातावरणाचे होते.

जिल्ह्याच्या काही भागात तुरळक‎ पाऊस झाला तर दिवसभर ढग दाटून‎ आल्याने व वातावरणातील उकाडा कमी‎ झाल्याने पावसाळ्यासारखी स्थिती निर्माण‎ झाली होती. तर हवामान विभागाच्या‎ अंदाजानुसार आणखी दोन दिवस‎ अवकाळी पावसाची शक्यता आहे. या‎ वातावरणाचा शेतीवर विपरित परिणाम होत‎ आहे.‎

पावसाचा कहर

यंदा अवकाळी पावसाने कहर केला‎ असून फेब्रुवारीपासून अवकाळी पाऊस होत‎ आहे. तुळजापूर येथील कृषी विज्ञान‎ केंद्रातील हवामानशास्त्रज्ञ नकुल‎ हारवाडीकर यांनी सांगितले की, फेब्रुवारीत‎ ८, मार्चमध्ये १२ तर एप्रिल महिन्यात १३‎ दिवस अंशत ढगाळ वातावरण होते. तसेच‎ मे महिन्यातही तीन दिवसांपासून ढगाळ‎ वातावरण असून आगामी दोन ते चार दिवस‎ काही भागात तुरळक पावसाची शक्यता‎ आहे.

तापमानाचा पारा वाढणार

ढगाळ वातावरण असल्यामुळे कमाल‎ तापमानाचा पारा ३५ अंशांवर आहे. मागील‎ दहा दिवसांत कमाल ३१ ते ३५ तर किमान‎ तापमान २१ ते २४ अंशांवर स्थिरावले आहे.‎ मात्र, आगामी काळात कमाल तापमान वाढणार असून ११‎ ते २० मे दरम्यान ४३ अंशांवर‎ तापमान जाण्याची शक्यता आहे.‎ तसेच किमान तापमानही २८‎ अंशांपर्यंत जाण्याची शक्यता‎ हवामान तज्ञांनी वर्तवली आहे.‎

उन्हातून आल्यावर पाणी पिणे टाळा

शुक्रवारी (दि.५) दिवसभर ढगाळ‎ वातावरण होते. काही भागात‎ अवकाळी पावसाने हजेरी लावली.‎ यामुळे वातावरणात पुन्हा थंडावा‎ निर्माण झाला. मात्र, सूर्यकिरण‎ लंबरूप असल्याने ढगाळ वातावरण‎ कमी झाल्यास उन्हाची तीव्रता‎ अधिक जाणवते. अशावेळी‎ उष्णतेचा त्रास होऊन नये, म्हणून‎ वयोवृद्धांसह बालकांची काळजी‎ घेण्याची गरज आहे. उन्हातून‎ आल्यावर पाणी पिणे टाळावे.‎

उच्चांकी तापमान

मे महिन्यात सूर्यकिरण लंबरूपात पडत आहेत. मात्र,‎ अवकाळी पावसामुळे सतत ढगाळ वातावरण असल्याने‎ किमान व कमाल तापमानाचा पारा कमी आहे. परंतु‎ अवकाळीची तीव्रता काही प्रमाणात कमी झाल्याने उन्हाचा‎ पारा वाढत आहे. यामुळे तापमान वाढण्यासह उकाड्यातही‎ मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. दोन दिवसानंतर जिल्ह्यात‎ तापमानात वाढ होण्यास सुरूवात होईल. ११ ते २० मे दरम्यान‎ उच्चांकी तापमानाची नोंद होण्याची शक्यता आहे.‎ - ए. के. भड, हवामान निरीक्षक, धाराशिव.‎