आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशहरातील जवाहर नवोदय विद्यालयात सोमवार (दि. ०१) इयत्ता सहावीच्या विद्यार्थ्यांचे पहिल्याच दिवशी गुलाब पुष्प, फुगे तसेच चाॅकलेट देऊन स्वागत करण्यात आले. इयत्ता सहावीत ७४ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे.
भारत सरकार चा शिक्षण मंत्रालय द्वारा चालविल्या जाणाऱ्या जवाहर नवोदय विद्यालयात इयत्ता सहावी तील विद्यार्थ्यांचे पहिल्याच दिवशी उत्साहात स्वागत करण्यात आले. विद्यालयाचे प्राचार्य गंगाराम सिंह यांनी इयत्ता सहावीचा वर्गातील मुला - मुलींचे गुलाबपुष्प, फुगे, चॉकलेट देऊन स्वागत केले. या वेळी बोलताना विद्यालयाचे प्राचार्य गंगाराम सिंह यांनी शाळेच्या शैक्षणिक प्रगतीचा आढावा घेतला व विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या भौतिक सुविधांची माहिती पालकांना दिली. यावेळी विद्यालयाचे कार्यालयीन अधीक्षक एम. पी. कुलकर्णी, एच. जी. जाधव, एस. आर. गजम, व्ही. एस. जाधव, आर. एम. अलसेट, अलका सुळ आदी शिक्षकांची उपस्थिती होती.
जिल्ह्यातील गणवंत विद्यार्थी
नवोदय विद्यालयात इयत्ता सहावी च्या वर्गात एकूण ७४ विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला आहे. नवोदय विद्यालयाचा वतीने प्रवेश परीक्षा घेऊन जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना विद्यालयात प्रवेश देण्यात आला आहे. अत्यंत कठीण समजल्या जाणार्या या परीक्षेत जिल्ह्यातील ७४ विद्यार्थी पात्र ठरले आहेत. प्रवेशास पात्र होण्यासाठी त्यांना पालक व शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.