आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संवाद यात्रा:पाऱ्यात शरद युवा‎ संवाद यात्रेचे स्वागत‎

वाशी21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

‎ तालुक्यातील पारा येथे युवक‎ जिल्हा कार्याध्यक्ष नितीन बिक्कड‎ यांच्या वतीने बुधवारी(दि.१)‎ दाखल झालेल्या शरद युवा संवाद‎ यात्रेतील मान्यवरांचे स्वागत‎ करण्यात आले.‎ पक्षाचे अध्यक्ष शरद पवार‎ यांच्या ८१ व्या वाढदिवसानिमित्त‎ राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे‎ प्रदेशाध्यक्ष महेबुब शेख यांच्या‎ मार्गदर्शनात आयोजित करण्यात‎ आलेली शरद युवा संवाद यात्रा‎ तालुक्यातील पारा येथे बुधवारी‎ दाखल झाली होती. यावेळी यात्रेत‎ सहभागी असलेल्या माजी‎ आमदार राहुल मोटे, महेबुब शेख‎ यांच्यासह मान्यवरांचे स्वागत‎ करण्यात आले.

यावेळी शेख‎ यांच्याकडून कार्यकर्त्यांना‎ मार्गदर्शन झाले. या शरद युवा‎ संवाद यात्रेच्या स्वागतासाठी माजी‎ जिल्हा परिषद सदस्य भास्करराव‎ शिंदे, मार्केट कमिटीचे‎ उपसभापती पांडुरंग भराटे, माजी‎ सोसायटी चेअरमन बाळासाहेब‎ भराटे, मनिष भराटे, दिलीपराव‎ भराटे, वसंतबप्पा मोरे,‎ डोंगरेवाडीचे नुतन चेअरमन‎ सुभाष कुरुंद, नामदेव घाडगे‎ उपस्थित होते. परिसरातील‎ पिंपळगाव, लाखनगाव, पारा,‎ डोंगरेवाडी, सारोळा, पिंपळवाडी,‎ फकराबाद, येथील स्थानिक नेते,‎ कार्यकर्ते उपस्थित होते.‎

बातम्या आणखी आहेत...