आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिंडीचे आगमन:चोखोबा ते तुकोबा‎ दिंडीचे शहरात स्वागत‎

उस्मानाबाद‎एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

येथील श्रीपतराव भोसले‎ हायस्कूलच्या प्रांगणात चोखोबा ते‎ तुकोबा - एक समतेची वारी या‎ दिंडीचे आगमन झाले.‎ या दिंडीचे औपचारिक स्वागत‎ आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे‎ अध्यक्ष सुधीर पाटील यांनी केले.

या‎ दिंडीचे आयोजक संत शिरोमणी‎ तुकाराम महाराजांचे दहावे वंशज‎ शिवाजी मोरे महाराज,माजी‎ राज्यसभा खासदार अमर साबळे ,‎ प्राचार्य उल्काताई धावारे -‎ चंदनशिवे , सचिन पाटील,‎ श्रवणदादा जावळे, वाल्मिक‎ सरवदे, महंत तुकोबा महाराज, डॉ.‎ बाबासाहेब वाल्हेकर , चंद्रकांत‎ साळुंखे, अॅड शशांक साबळे अॅड.‎ अनिता जगताप ,मनोज भालेराव ,‎ विनायक राऊत ,अॅड. वाल्मिक‎ निकाळजे , सौ. श्रद्धा जगताप, डॉ.‎ भरत नांदुरे, शेषाद्री अण्णा डांगे ,‎ प्रा.डॉ. रमेश पांडव , निलेश गद्रे ,‎ फुलचंद नागटिळक , प्रा. सोमनाथ‎ लांडगे , ऋषिकेश सकनुर , सुधीर‎ बिक्कड , आदर्श शिक्षण प्रसारक‎ मंडळाचे प्रशासकीय अधिकारी‎ आदित्य पाटील सह इतर मान्यवर‎ उपस्थित होते.

‎शिवाजीराव मोरे महाराज‎ भाषणात म्हटले की, चोखोबा पासून‎ संत तुकाराम महाराजांपर्यंत‎ समतेच्या वाटेवर चालत राहणाऱ्या‎ समाजात काही स्वार्थी तत्वे‎ घुसल्याने जातीपातीच्या‎ राजकारणामुळे समाजाचे नुकसान‎ होत आहे. तेव्हा ही भिंत दूर करून‎ समता प्रस्थापित करण्यासाठी‎ सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत.‎ त्याचबरोबर प्रत्येकाने वृक्षांचे‎ संवर्धन करावे, असा मोलाचा‎ उपदेश त्यांनी या निमित्ताने केला.‎ कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जगताप‎ एस .एच यांनी केले तर सर्वांचे‎ आभार संस्थेचे अध्यक्ष सुधीर‎ पाटील यांने मानले.‎

बातम्या आणखी आहेत...