आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजिल्ह्यात बुधवारपासून शाळांची घंटा वाजली. अनेक शाळा, परिसर, अंगण सजविण्यात आले होते. ग्रामीण भागात विद्यार्थ्यांचे हर्षोल्हासात स्वागत करण्यात आले. उमरगा तालुक्यातील कोरेगाव जिल्हा परिषद शाळेने विद्यार्थ्यांची सजविलेल्या ट्रॅक्टरमधून गावातून मिरवणूक काढण्यात आली. तर अनेक गावांमध्ये बैलगाड्यातून विद्यार्थ्यांची मिरवणूक काढत त्यांचे उत्सफूर्त स्वागत करण्यात आले.
फुल देऊन स्वागत
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दोन वर्षांपासून शाळा पहिल्या सारख्या सुरू नव्हत्या. मात्र, आता 2 वर्षांनतंर शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांचे जल्लोशात स्वागत करण्यात आले. बुधवारी शाळेचा पहिला दिवस होता. त्यामुळे आठवड्यापासूनच शिक्षण विभागाकडून शाळास्तरावर विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी वेगवेगळ्या संकल्पना सूचविण्यात आल्या होत्या. त्यानुसार पाना-फुलांनी शाळांची सजावट करण्यात आली होती. शाळेच्या अंगणात रांगोळ्यांची आरास घालण्यात आली होती. नवागतांसह सर्व विद्यार्थ्यांचे फुल देऊन स्वागत करण्यात येत होते. नवागत विद्यार्थ्यांचा शाळेबद्दलचा दृष्टीकोण सकारात्मक व्हावा, मनातील भीती, तणाव दूर व्हावा, यासाठी त्यांची शाळेत प्रवेश करण्यापूर्वी गावातून मिरवणूक काढण्यात आली.
विद्यार्थ्यांच्या अंगावर पुष्पवृष्टी
त्यामुळे विद्यार्थी चैतन्यमय वातावरणात दंग झाले. बहुतांश शाळांमध्ये पहिल्या दिवशी नियमित अध्ययन न घेता ओळखी, संवाद असा उपक्रम घेण्यात आला. उमरगा तालुक्यातील कोरेगाव जिल्हा परिषद शाळेत पहिलीच्या विद्यार्थ्यांची ट्रॅक्टरमधून भव्य मिरवणूक काढून पहिला दिवस जल्लोषात साजरा करण्यात आला. आयएसओ मानांकन प्राप्त असलेल्या कोरेगाव शाळेत विद्यार्थ्यांची ट्रॅक्टरमधून मिरवणूक काढण्यात आली. भव्य मिरवणुकीचे हणमंत डावरगे यांच्या हस्ते श्रीफळ फोडून उद्घाटन झाले. गटशिक्षणाधिकारी शिवकुमार बिराजदार यांनी शाळेच्या या नावीन्यपूर्ण उपक्रमाबद्दल शाळेचे व गावकरी मंडळींचे कौतुक केले. मिरवणुक वेळी गावातील पालकांनी विद्यार्थ्यांचे पुष्पवृष्टी करून स्वागत करण्यात आले.
पालक महेश खटके यांनी सर्व विद्यार्थ्यांना साखर वाटून शाळेचा पहिला दिवस साजरा केला. यावेळी सरपंच संजय पाटील, उपसरपंच तथा शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष विश्वजीत खटके यांच्यासह गट शिक्षणाधिकारी शिवकुमार बिराजदार, केंद्रप्रमुख प्रकाश मुळे, मनोहर बंडगर, कोंडीबा पांगे, विशाल खटके, अतुल बंडगर, भगवान कांबळे, पिंटू पांगे, रवी पांचाळ, श्रीदेवी खटके, राजश्री सूर्यवंशी, अंबाजी सूर्यवंशी, मुख्याध्यापक प्रवीण स्वामी, अशोक बिराजदार, लक्ष्मी वाघमारे, उमाचद्र सूर्यवंशी यासह ग्रामस्थ, पालक व विद्यार्थी उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.