आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोयाबीन पिकाचे प्रचंड नुकसान:सततच्या पावसाने नुकसान झालेल्यांना भरपाई कधी; खासदार ओमराजेंचा प्रश्न

उस्मानाबाद20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यातील सर्व तालुक्यांसह लातूरमधील औसा, निलंगा व सोलापुरातील बार्शी तालुक्यातील सर्व महसूल मंडळात जुलै ते सप्टेंबर महिन्यात सतत पाऊस, शंखी गोगलगाय, येलो मोझॅक व खोडमाशीमुळे सोयाबीन पिकाचे प्रचंड नुकसान झाले. याला नुकसान भरपाई कधी मिळणार, असा प्रश्न खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी उपस्थित केला.

ते म्हणाले की, अगोदर पावसाने व नंतर मोझॅक, खोडमाशी व चक्री भुंगा या कीडींचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे सोयाबीन पिकामध्ये मर होत असून उर्वरित सोयाबीन पीक हे शेतकऱ्यांच्या हातातून गेले. नैसर्गिक आपत्ती व सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकासन झाले आहे. याचे देखील पंचनामे करण्याची गरज आहे, असे राजेनिंबाळकर यांनी प्रसिद्धी पत्रकातून म्हटले आहे.

बातम्या आणखी आहेत...