आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रश्न:आम्हाला शुद्ध पाणी का देत नाही, महिलांचा कळंब पालिकेला प्रश्न?

कळंब4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहराला मागील काही दिवसांपासून पिवळ्या दूषित पाण्याचा पुरवठा केला जात आहे. याला वैतागलेल्या महिलांनी सोमवारी (दि. ५) थेट नगरपालिका गाठली आणि आम्हाला शुद्ध पाणी का देत नाही, या पिवळसर पाण्यामुळे घरातील व्यक्ती आजारी पडत आहेत, असे म्हणत जाब विचारला.

शहराला मांजरा प्रकल्पातून पाणीपुरवठा होतो. परंतु मागील काही दिवसांपासून नळाद्वारे पिवळसर पाणी येत आहे. हे पाणी पिण्यायोग्य नाही. सध्या लहान मुलांमध्ये रोगराईचे प्रमाण वाढले आहे. शहरात गॅस्ट्रोची साथ देशी सुरू असून रुग्णालये भरली आहेत. सध्या पालिकेवर प्रशासकाचा कारभार सुरू आहे. महिला व सामाजिक कार्यकर्त्यांनी पालिका प्रशासनाला निवेदन देऊन नळाद्वारे पिण्याच्या शुद्ध पाण्याचा पुरवठा करण्याची मागणी केली.

नगरपरिषद प्रशासनाने लवकरात लवकर शुद्ध पाणी देण्याचा प्रयत्न करू, असे आश्वासन दिले. निवेदनावर आम आदमी पार्टीचे शहराध्यक्ष अकिब पटेल, राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष नितीन वाडे, रुग्णकल्याण समितीचे सदस्य हर्षद अंबुरे, कृष्णा जाधव, अनिता नरवडे, गंगा खुळे, मीना भाकरे, प्रतिभा खांबे, सत्यशीला उपाडे, रुक्मिणी पोटे, चित्रा कुलकर्णी, शोभा जाधव, छाया ताटे, मैना भंडारे, उज्वला चव्हाण, बारखूबाई आडसूळ आदींच्या स्वाक्षरी आहेत.

बातम्या आणखी आहेत...