आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नासाडी:भूम तालुक्यात रानडुकरांचा‎ उभ्या पिकांमध्ये हैदोस‎

भूम‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरासह ग्रामीण भागातील‎ शेतांमधील उभ्या पिकात‎ रानडुकरांनी हैदोस घातला आहे.‎ यामुळे ऊस, ज्वारी व मका पिकांचे‎ मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने‎ शेतकरी त्रस्त झाले आहेत. त्यामुळे‎ वनविभागाने या रानडुकरांचा‎ बंदोबस्त करावी, अशी मागणी‎ शेतकऱ्यांमधून होत आहे.‎ तालुक्यात रानडुकरांमुळे रब्बी‎ हंगामातील पिकांची मोठ्या प्रमाणात‎ नासाडी होऊ लागल्याने शेत त्रस्त‎ आहेत.

ज्वारी, ऊस, मका या‎ पिकांचे अतोनात नुकसान झाले‎ आहे. तालुक्यात मोठ्या प्रमाणात‎ डोंगराळ भाग आहे. रानडुकरं‎ दिवसभर तेथे लपून रात्रीचे पिकांवर‎ हल्ला चढवत आहेत. ही रानडुकरं‎ दिवसा उसाच्या फडात असतात.‎ रात्र झाल्यानंतर पिके फस्त करतात.‎ रानडुकरे मुळासहित ऊस खात‎ असल्याने मोठे नुकसान होत आहे.‎

डुकरांचा धुमाकूळ असाच सुरू‎ राहिल्यास पिकांपासून उत्पन्न‎ मिळणे दुरापास्त आहे, अशी व्यथा‎ शेतकरी मांडत आहेत. तालुक्यातील‎ भूम, हाडोंग्री, हिवरा, वंजारवाडी,‎ आरसोली, सावरगाव या परिसरात‎ रानडुकरांच्या टोळ्या आहेत.‎

प्रतिबंध केल्यास रानडुक्कर अंगावर‎ धावून चावा घेतात, असे‎ शेतकऱ्यांचे म्हणने आहे. वन्य‎ प्राण्यांपासून पिकांच्या संरक्षणासाठी‎ शेतकरी नवनवीन क्लुप्त्या काढत‎ आहेत. औषधांचा वापर करत‎ आहेत. परंतु वन्यप्राणी पिकांची‎ नासाडी करतच असल्याने शेतकरी‎ त्रस्त झाले आहेत. तालुक्यातील‎ शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी‎ वनविभागाने रानडुकरांचा बंदोबस्त‎ करावा, अशी मागणी माजी‎ नगराध्यक्ष विजयसिंह थोरात यांनी‎ केली आहे. शेतकऱ्यांना यातून‎ दिलाशाची आशा लागली आहे.‎

बातम्या आणखी आहेत...