आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ग्वाही:प्रमुख क्षेत्रात विकासासाठी निधीची तरतूद करणार;  केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. कराड यांची ग्वाही

उस्मानाबाद9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यातील प्रमुख क्षेत्रात विकासासाठी प्रस्ताव सादर करावेत. यासाठी निधीची तरतुद करण्यात येईल, अशी ग्वाही केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी दिली. भारतीय जनता पक्षाच्या जिल्हा मेळाव्यात कार्यकर्त्यांशी संवाद साधत असताना डॉ. कराड बोलत होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार राणाजगजितसिंह पाटील होते. राष्ट्रीय संघटनमंत्री दुष्यांतकुमार गौतम, जिल्हाध्यक्ष नितीन काळे, माजी जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी, अॅड. मिलींद पाटील, सुधीर पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

डॉ. कराड म्हणाले, जिल्ह्यातील आरोग्य सुविधा विशेषतः निमिया आणि बालकांमधील कुपोषणावर नियंत्रण, जिल्ह्यातील मुलींचे जन्मदराचे प्रमाण वाढवण्यासाठी, अवैध गर्भपात आणि गर्भलिंग निदानावर आळा घालण्यासाठी जनजागृती करण्याची गरज आहे. लहान मुलांसाठी स्वतंत्र रुग्णालय, जिल्हा रुग्णालयाचा विस्तार, ग्रामीण भागात जलसंधारणाची कामे आणि जनजीवन मिशन या योजनेची प्रभावी अंमलबजावणी करावी.

बातम्या आणखी आहेत...