आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

​​​​​​​दिव्य मराठी विशेष:गावचे नवीन कारभारी युवकांच्या मागणीकडे लक्ष देतील का? ; ज्येष्ठ वि. तरूण लढत

कळंब3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

निवडणुकांचा धुरळा उडाला आहे. या निवडणुकांबाबतची युवक मतदार यांची येणाऱ्या नुतन सरपंच व सदस्याकडून भरपूर अपेक्षा आहे. हे विराजमान होणारे नवीन गावचे कारभारी युवकांच्या मागणीकडे लक्ष देतील का नाही हे पुढील काळात समजणार आहे. कळंब तालुक्यातील ३० गावांमध्ये निवडणुकीला रंग चढू लागला आहे. विशेष म्हणजे या निवडणुकीत तरुणांचा कल वाढत असून ज्येष्ठांना यंदा निवडणुकीत तरुणांचा सामना करावा लागणार असल्याचे चित्र आहे.

गावात सगळेच एकमेकांना ओळखत असतात,संकट प्रसंगी मदतीस धावून येतात, गावातील ग्रामस्थ मंडळी प्रत्येकाला धरून असतात. ह्याच भावनेनं विकासाला प्राधान्य देऊन उमेदवारांमध्ये निरोगी स्पर्धा असावी. हार-जीत मान्य करून त्यांनी निवडणुकीनंतर एकत्र येऊन सर्वांचा विकास करावा. निकालानंतर बऱ्याचदा हाणामाऱ्या होतात त्यामुळे गावाचा विकास गटातटांच्या राजकारणात राहून जातो, याचा परिणाम गावातील सामाजिक स्वास्थावर दिसून येतो. अशी खंत युवक कुलदीप गायकवाड यांनी व्यक्त केली.

मतदानासाठी गावातील सुशिक्षित, शिकलेल्या मुलांनी आवर्जून वेळ काढून आलं पाहिजे. आपलं मत गावाच्या विकासात हातभार लावू शकतं. ह्या गोष्टीचा विचार करून त्यांनी उत्स्फूर्तपणे मतदान केलं पाहिजे. तरुण मुला- मुलींमध्ये गोष्टी बदलण्याची धमक असते. नवा विचार असतो तो त्यांनी पूर्ण केला पाहिजे. अशी भावना युवकांची युवकांची असून या निवडणुकीत उमेदवारी असणारे युवक भविष्यात निवडणूक आल्यावर युवकांच्या प्रगती करीता सरसावतील हीच अपेक्षा युवक मतदार अजय तांबारे हे व्यक्त करत आहेत.

मस्सा खं येथील यशपाल शिंदे म्हणाले की, गावातील युवकांनी शेतीकडे एक व्यवसाय म्हणून पहात आहेत.त्यासाठी पारंपरिक शेती ऐवजी आधुनिक शेती करण्यासाठी युवकांना ग्रामपंचायत अंतर्गत मार्गदर्शन करावे. शेती करताना शेतीबरोबरच प्रक्रिया उद्योग, शेती पूरक व्यवसाय यासाठी मदत करावी.ज्यामुळे शेतकरी आर्थिक दृष्ट्या सक्षम बनेल खामसवाडी येथील कुलदीप घावटे म्हणाले की, सध्या गावागावातील युवक व्यसनाच्या आहारी जात आहे. भविष्यात व्यसनमुक्ती ची चळवळ उभा करावी तसेच गावात व्यायाम शाळा तयार करणेही आवश्यक आहे.

उमेदवारांकडून हवी आहेत ही आश्वासने
गावातील युवक अश्रूबा नागटिळक म्हणाले की, मोहा गावामध्ये भरपूर प्रमाणात युवक-युवती हे पोलीस,आर्मी,सारखी सुरक्षा क्षेत्रातील तयारी करत आहेत, परंतु ह्या युवकांसाठी गावामध्ये भरतीची तयारी करण्यासाठी मैदान नाही, त्याचबरोबर स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी कित्येक मुला मुलींना गाव सोडून दुसऱ्या शहरात स्थलांतरित व्हावे लागते, मी स्वतः गावात अभ्यासिका नसल्यामुळे इतर शहरात स्थलांतरित झालेलो आहे, त्यामुळे मला आर्थिक आणि भरतीसाठी खराब रस्ता आणि त्यामुळे विस्कळीत होत असणारी वाहतूक ह्या मुळे मला वेगवगळया समस्येला तोंड द्यावे लागले आहे. त्यामुळे मोहा ग्रामपंचायत निवडणूक लढवणाऱ्या सर्व उमेदवारांनी जाहीर करावे की आम्ही निवडून आल्यावर गावा मध्ये सुसज्ज असे ग्रंथालय-अभ्यासिका आणि त्याच बरोबर पोलीस आर्मी साठी भरती करणाऱ्या युवक-युवतींसाठी मैदान एका वर्षात निर्माण करून देऊ.ही आश्वासने आवश्यक आहेत.

बातम्या आणखी आहेत...