आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कर्तुत्वाचा सन्मान:जिल्हास्तरीय कबड्डीसह ज्युदो स्पर्धेमधील विजेत्यांचा सत्कार

उमरगाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील बलसूर येथील श्री छत्रपती शिवाजी माध्यमिक व उच्चमाध्यमिक विद्यालयात शनिवारी (दि.१७) तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत व जिल्हास्तरीय ज्युदो स्पर्धेत विद्यार्थ्यांनी यश संपादन करून जिल्हा व विभागीय स्पर्धेसाठी स्थान मिळवले आहे. या यशाबद्दल खेळाडूंचा विद्यालयाच्या वतीने सत्कार करण्यात आला.

बलसूर श्री छत्रपती शिवाजी विद्यालयाच्या खेळाडूंनी यश मिळवून यशाची परंपरा कायम राखली आहे. तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धा सखुबाई माध्यमिक आश्रमशाळा बलसूरतांडा येथे पार पडल्या. या स्पर्धेत श्री छत्रपती शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील १९ वर्षाखालील मुलींचा संघ व १७ वर्षाखालील मुलांचा संघ तालुक्यात प्रथम येऊन जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. विद्यालयाच्या वतीने खेळाडूंचा व मार्गदर्शक क्रीडा शिक्षक एम. डी. काळे यांचा उपमुख्याध्यापक नाना कुसुमडे व पर्यवेक्षक सुभाष औरादे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

या सत्काराला उत्तर देताना क्रीडाशिक्षक मालाजी काळे आणि खेळाडूंनी मनोगतपर भाषण झाली. एस. टी. गायकवाड यांनी सूत्रसंचालन करून अभार मानले. यावेळी आरोग्य सेविका सोनाली सगर, शिक्षिका उषा गवारे, सतीश वाकडे, गुरुलिंग वाकडे, सतीश पटवारी, प्रा. एन. आर. तेलंग, सुनीता साळुंके, जुगल चव्हाण, भैरवनाथ सर्जे, ग्रंथालयाचे के. डी. कांबळे, प्रा. सुनिल बिराजदार, प्रा. दत्तात्रय राठोड, प्रा. भागवत जाधव, प्रा. परमेश्वर कांबळे, प्रा. गोवर्धन पाटील, प्रा. सचिन चव्हाण, प्रा. विजय घोडके, प्रा. अक्षय जाधव, वरिष्ठ लिपिक दत्तात्रय जाधव, ओमकार जमादार, मधुकर सरवदे, अब्दुल अत्तार, राजु चव्हाण, बालाजी मुर्टे, अनुसया भाले, शंकर बिराजदार, राम दुधभाते व विद्यार्थी उपस्थित होते.

अस्मिताचे ज्युदोत तर धनराजचे धनुर्विद्येत यश
क्रीडा व युवक सेवा संचालनालयांतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात आयोजित जिल्हास्तरीय शालेय ज्युदो क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक पटकावल्याबद्दल अस्मिता अमोल पाटील या विद्यार्थिनीच्या यशाबद्दल उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. १२ वी विज्ञान शाखेतील दिग्विजय धनराज फुरडे या विद्यार्थ्याने धनुर्विद्या जिल्हास्तरीय स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळवून विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली. याबद्दल सत्कार झाला.

कौशल्याचा, गुणातून नाव उज्ज्वल करावे
अस्मिता पाटील हिने सुवर्णपदक पटकावल्याबद्दल मनोगत व्यक्त केले. उपमुख्याध्यापक कुसुमडे म्हणाले, शालेय जीवनात विद्यार्थ्यांनी अभ्यासासह क्रीडा क्षेत्रात सहभाग घ्यावा. कला-गुणांचा आविष्कार घडवून विद्यालयासह स्वतःचे नाव उज्ज्वल करावे. कब्बडी स्पर्धेत राष्ट्रीय स्तरावर झेप घेतलेल्या विद्यालयाचा संघ असून तीच परंपरा जिल्हास्तरावर निवड झालेल्या खेळाडूंनी जोपासावी.

बातम्या आणखी आहेत...