आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:महाराष्ट्राच्या दोन्ही संघांची विजयी सलामी ; राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धा सुरू

उस्मानाबाद9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्र खो-खो संघटना व उस्मानाबाद जिल्हा खो-खो संघटनेतर्फे तुळजाभवानी जिल्हा क्रीडा संकुलात आयोजित ५५ व्या राष्ट्रीय अजिंक्यपद पुरुष महिला खो-खो स्पर्धेत महाराष्ट्राच्या पुरुष व महिला दोन्ही संघांनी डावाने बाजी मारत विजयी सलामी दिली. पुरुषांच्या सामन्यात महाराष्ट्राने मध्य प्रदेशवर २०-८ असा डावाने विजय मिळविला. यात सुयश गरगटे २.२० मिनिटे संरक्षण व ५ गुण, रामजी कश्यपने ३.२० मिनिटे संरक्षण केेले. निहार दुबळेने आक्रमणात ४ गुण मिळवले. मध्य प्रदेशकडून विवेक यादव व सागरने २-२ गुण मिळवले. महिलांमध्ये महाराष्ट्रने तेलंगणाचा १९-६ असा डावाने धुव्वा उडवला. प्रियंका इंगळेने ७ गुण, रेश्मा राठोडने (२.१० मि. संरक्षण व ४ गुण), रूपाली बडे व दीपाली राठोड (२.५० मि. संरक्षण) व अपेक्षा सुतार (२.४० मि. संरक्षण) यांनी महाराष्ट्राला विजयी केले.

बातम्या आणखी आहेत...