आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कृषीमाल:किसान रेल्वे सुरू झाल्याने पुन्हा दिल्ली बाजारपेठेत माल पाठविणे शक्य हाेईल

कंदर5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कुर्डुवाडी जंक्शनवरून दिल्लीला शेतमाल पाठवण्याची सेवा सुरू झाली आहे. हुबळी निजामुद्दीन एक्स्प्रेसमधून शेतकऱ्यांना आपला कृषीमाल पाठवता येईल. दर शनिवारी ही रेल्वे धावणार आहे. हुबळी निजामुद्दीन एक्स्प्रेसला पार्सल सेवा सुरू केली आहे. रेल्वेने किसान रेल्वे सेवा सुरू केल्यापासून जिल्ह्यातील सांगोला, माढा, माळशिरस, करमाळा तालुक्यातील डाळिंब, केळी, पेरू, सीताफळ व भाजीपाला यासारखी फळ पिके दिल्ली बाजारपेठेत सवलतीच्या दरात पाठवली जात होती. शेतकऱ्यांच्या मालाला चांगला भाव मिळत हाेता. मात्र गेल्या एप्रिल महिन्यापासून ही सेवा बंद होती. शेतकरी उत्पादक कंपनीचे अध्यक्ष किरण डोके, विजय लबडे, नानासाहेब साळुंके व इतरांनी याबाबत पाठपुरावा केला.

बातम्या आणखी आहेत...