आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराउस्मानाबाद तालुक्यातील ढोकी ग्रामपंचायतीसाठी उमेदवारी अर्ज माघार घेण्याच्या शेवटच्या दिवशी सरपंच पदासाठी आठ व सदस्य पदासाठी ६९ उमेदवारांनी लढती-तून माघार घेतली. त्यामुळे गावात आता चौरंगी लढत होत आहे.ग्रामपंचायत निवडणुकीसाठी माघार घेण्याचा बुधवारी अखेरच्या दिवशी ढोकी येथील सरपंच पदासाठी १२ उमेदवारांनी नामांकन पत्र दाखल केले होते. त्यापैकी आठ उमेदवारांनी लढतीतून माघार घेतली. सरपंच पदासाठी चार पॅनलचे चार उमेदवार मैदानात आहेत. तसेच ग्रामपंचायत सदस्य पदासाठी सहा प्रभागात मिळून १७ जागांसाठी १३७ उमेदवारांनी नामांकन पत्र दाखल केले होते.
त्यापैकी ६९ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने लढतीत ६८ उमेदवार रिंगणात आहेत. सरपंच पद नागरिकाच्या मागास प्रवर्गातील महिलेसाठी राखीव आहे. कै. किसन समुद्रे बहुजन ग्रामविकास पॅनेलकडून सरपंच पदासाठी अश्विनी माळी, ढोकी ग्रामविकास आघाडीकडून उषा माळी, भारतीय जनता पक्ष प्रणित डॉ. पद्मसिंह पाटील बहुजन ग्रामविकास आघाडीकडून माजी जिल्हा परिषद सदस्या मीना माळी, बाळासाहेबांची शिवसेना पक्ष प्रणित तानाजीराव सावंत ग्राम विकास आघाडीकडून पूजा डोलारे हे सरपंच पदाचे उमेदवार आहेत. या लढतीत आम आदमी पक्ष, मनसे व एम.आय.एम यांनीही उडी घेतली. ग्रामपंचायत मध्ये ११४५३ मतदार असून १८ डिसेंबर रोजी मतदान तर २० डिसेंबरला मतमोजणी आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.