आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हा दाखल:महिलेने फोडले शेजाऱ्याचे घर,‎ 65 हजार मुद्देमालासह ताब्यात‎

येरमाळा15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

‎वाशी तालुक्यातील वडजी येथे चार‎ मार्च रोजी दुपारी तीन ते सायंकाळी‎ सव्वासहा वाजेच्या सुमारास‎ घरफोडी करुन ६५ हजार रुपयांचा‎ दस्ताऐवज चोरुन नेल्याची घटना‎ घडली होती. या प्रकरणी गुन्हा‎ दाखल झाल्यानंतर पोलिस‎ तपासातून शेजारच्या महिलेकडून‎ चोरलेले सर्व दागिने जप्त करुन‎ तिलाही ताब्यात घेतले आहे.‎ पोलिसांकडून माहितीनुसार संदीप‎ लहु मोराळे (रा. वडजी) हे घराला‎ कुलूप लावून शेतात कामानिमित्त‎ गेले होते. त्यावेळी अज्ञात चोरट्याने‎ कडी-कोंडा काढून घरात प्रवेश‎ करून ६५ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला.

या‎ प्रकरणी येरमाळा पोलिस ठाण्यात‎ गुन्हा दाखल करण्यात आला होता.‎ येरमाळा ठाण्याचे दिनकर गोरे यांनी‎ आठ दिवसात गुन्हा उघड केला.‎ कपिल बोरकर यांना मिळालेल्या‎ माहितीवरून घटनास्थळाच्या‎ शेजारी राहणारी महिला मणकर्णा‎ नारायण मोराळे (५८) यांच्या‎ घराची झाडाझडती घेतली. तेव्हा‎ गुन्ह्यात चोरून नेलेला मुद्देमाल‎ (एक चांदीचा करदोडा, लहान‎ मुलाची पिळयाची सोन्याची अंगठी,‎ दोन लहान मुलांचे सोन्याचे बदाम,‎ कानातील सोन्याचे झुंबर व लटकन,‎ ६४ मण्यांचे दोन डोरले असलेली‎ सोन्याची पोत, एक चांदीचा लहान‎ मुलाचा वाळा, एक सोन्याची‎ लेडीज अंगठी) आढळला. हा‎ मुद्देमाल जप्त करुन सदर महिलेला‎ अटक केली. ही कामगिरी गोरे,‎ आनंदराव वाठोरे, कपिल बोरकर,‎ तस्लिम चोपदार, विशाल‎ गायकवाड, शाहरुख पठाण,‎ चालक निसार शेख यांनी केली.‎

बातम्या आणखी आहेत...