आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवरात्र महोत्सव:महिला डॉक्टरांचा नवदुर्गा म्हणून सन्मान‎ ; प्रशस्तीपत्र व ट्रॉफी देऊन यथोचित‎ सत्कार

नळदुर्ग2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तुळजापूर तालुक्यातील‎ खुदावाडी येथे समृद्धी महिला मंडळ ‎ ‎ खुदावाडी आयोजित यांच्यावतीने‎ शारदीय नवरात्र महोत्सवानिमित्त‎ वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य‎ करणाऱ्या खुदावाडी येथील १५ डॉक्टर ‎ ‎ महिला नवदुर्गा सन्मान सोहळा‎ प्रशस्तीपत्र व ट्रॉफी देऊन यथोचित‎ सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात‎ डॉ. साधना कवारे,डॉ वैशाली नरवडे,‎ डॉ. रेणुका अहंकारी,डॉ.चैतन्या‎ चिंचोले,डॉ सुज्ञान आळगुंडगी,डॉ.‎ प्रफुल्लता कबाडे,डॉ. कांचन‎ खैराटकर,डॉ. विणा कबाडे,डॉ. पंकजा‎ स्वामी,डॉ. कौशल्य गिरवलकर,डॉ.‎अंजली कबाळे या महिला डॉक्टरांचा‎ उपस्थित मान्यवरांच्या हस्ते नवदुर्गा‎ म्हणून यथोचित सन्मान करण्यात आला.‎ या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी गावचे‎ सरपंच शरद नरवडे हे होते.तर प्रमुख‎ पाहुणे म्हणून उस्मानाबाद जिल्हा‎ परिषदचे माजी अध्यक्षा अस्मिता‎ कांबळे, नळदुर्ग पोलीस ठाण्याचे‎ सहाय्यक पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर गोरे‎ ,ज्येष्ठ डॉ सिद्रामप्पा खजुरे, शिवदास‎ कांबळे, प्राचार्य उमाकांत चनशेट्टी‎ उपस्थित होते.‎

बातम्या आणखी आहेत...