आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उपक्रम:महिला कर्मचाऱ्यांकडे ठाण्याचा कारभार‎

उमरगा‎13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जागतिक महिला दिन तालुक्यात सर्वत्र‎ उपक्रमा‎तून साजरा होत असताना‎ उमरगा पोलीस ठाण्यात बुधवारी (८)‎ महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी एक दिवस‎ पोलीस ठाण्याचा कारभार सांभाळून‎ प्रशासन कसे सांभाळले जाते याचा‎ अनुभव घेतला.‎ बुधवारी पोलीस ठाण्यातील महिला‎ पोलीस कर्मचाऱ्यांनी ठाणे पोलीस‎ निरीक्षक यासह सर्व सूत्रे महिला‎ अधिकाऱ्यांनी सांभाळली.

यावेळी संपूर्ण‎ दिवसभर प्रभारी अधिकारी म्हणून पोलीस‎ कर्मचारी सुनीता राठोड यांनी कार्यभार‎ सांभाळला.याव्यतिरिक् त पोलीस ठाणे‎ अंमलदार, मदतनीस, लॉक अप डयूटी‎ आदी कारभार सर्व कामे पोलीस कर्मचारी‎ महिलांनी जबाबदारीने सांभाळली.‎ सकाळी पोलीस निरीक्षक यांचे खुर्चीवर‎ हेड कॉन्स्टेबल सुनीता राठोड यांना‎ जबाबदारी देण्यात आली.

राठोड यांच्या‎ नेतृत्वाखाली पोलीस नाईक अन्नपूर्णा‎ पांचाळ, सारिका चव्हाण, बबीता चव्हाण,‎ शांताताई कंदले, मीरा गुंजकर, शिवकांता‎ भिसे, स्वाती कौरव, सोनी काळे, ज्योती‎ घुगे या महिला कर्मचाऱ्यांनी पोलीस ठाणे‎ कारभार सांभाळला. प्रारंभी पोलीस‎ निरीक्षक मनोजकुमार राठोड, सहाय्यक‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ पोलीस निरीक्षक महेश क्षीरसागर यांच्या‎ हस्ते ठाण्यात सर्व महिला पोलीस‎ कर्मचाऱ्यांचे पुष्पगुच्छ देवून सत्कार‎ करण्यात आला.‎

एकुरगा शिवशक्ती विद्यालय‎
तालुक्यातील एकुरगा येथील‎ शिवशक्ती विद्यालय येथे जागतिक महिला‎ दिन विविध कार्यक्रमाने साजरा करण्यात‎ आला.ज्ञान विकास शिक्षण संस्थेचे‎ अध्यक्ष प्रकाश बोंडगे हे अध्यक्षस्थानी‎ होते. प्रारंभी प्रतिमा पूजन विद्यार्थ्यांचे हस्ते‎ करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी‎ आपले मनोगत व्यक्त केले. सहशिक्षक‎ राजेंद्र सगर, धनराज पाटील यांनी महिला‎ दिनानिमित्त मार्गदर्शन केले. यावेळी श्री‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ बोंडगे यांनी महिला दिनानिमित्त‎ महिलांच्या कार्याचा गुणगौरव केला.‎ यासाठी शिक्षक, कर्मचारी व विद्यार्थी‎ उपस्थित होते. अजित साळुंके यांनी‎ सूत्रसंचलन केले.सिध्देश्वर वाकडे यांनी‎ आभार मानले‎

माडज येथे महिला दिन‎
तालुक्यातील माडज येथे जागतिक‎ महिला दिनाच्यानिमित्त गावातील उद्योग व‎ बचत गटाच्या यशस्वी महिलांचा सत्कार‎ ग्रामपंचायत कार्यालयाच्या सरपंच सारिका‎ पाटील,ग्रापं सदस्य व ग्रामविकास‎ अधिकारी यांच्या उपस्थितीत महिलांचा‎ शाल, श्रीफळ, फेटा बांधून सत्कार‎ करण्यात आला.‎

बातम्या आणखी आहेत...