आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सकारात्मक दृष्टिकोन:अकलूजमध्ये ‘दुर्गाशक्ती’ पुरस्काराने महिलांचा सन्मान

अकलूज2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पोलिस प्रशासनाचा नेहमी गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या नागरिकांबरोबरच जास्त संबंध येत असतो. परंतु अकलूज येथील सेवेत चांगल्या व सकारात्मक दृष्टिकोन ठेवणाऱ्या नागरिकांबरोबर सेवा देण्याची संधी मिळत असल्याचे मत अकलूजचे पोलिस उपाधीक्षक डॉ. बसवराज शिवपूजे यांनी व्यक्त केले. अकलूज पोलिस ठाण्याअंतर्गत पोलिस प्रशासनास सहकार्य करणाऱ्या विविध क्षेत्रातील महिलांना ‘दुर्गाशक्ती’ म्हणून सन्मानित करण्यात आले. या वेळी डॉ. शिवपूजे बोलत होते.

सध्या सुरू असलेल्या पोलिस प्रशासनास नेहमी सहकार्य करणाऱ्या महिलांचा ‘दुर्गाशक्ती’ सन्मान व सत्कार सोहळा आयोजित केला होता. डॉटर्स मॉमच्या अध्यक्ष शीतलदेवी मोहिते पाटील प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. या वेळी पोलिस निरीक्षक अरुण सुगावकर, पोलिस उपनिरीक्षक स्वाती कांबळे, पोलिस उपनिरीक्षक बबनराव साळुंखे, अंमलदार सीमा सोनवणे, नाजमीन तांबोळी, वैष्णवी बाबर, अनुराधा अडगळे, रामचंद्र चौधरी, सुहास क्षीरसागर, मनोज शिंदे आदी उपस्थित होते. पोलिस उपनिरीक्षक बबनराव साळुंखे यांनी सूत्रसंचालन केले.

पोलिसांप्रती चांगली भावना
डॉटर्स मॉमच्या अध्यक्ष शीतलदेवी मोहिते पाटील म्हणाल्या, चित्रपट आदी माध्यमात पुढारी आणि पोलिस यांची प्रतिमा नकारात्मक दाखवली जाते. परंतु प्रत्यक्षात राजकीय नेते, पोलिस प्रशासन हे समाजसेवेच्या बाबतीतील महत्त्वाचे घटक आहेत. पूर्वी लोक पोलिस ठाण्यात जायला घाबरायचे. परंतु अकलूज ठाण्याने सामाजिक पातळीवर विविध उपक्रमांमधून संपर्क ठेवल्याने चांगली भावना निर्माण झाली.

बातम्या आणखी आहेत...