आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करास्त्री आहे म्हणून घराला घरपण आहे. ती आहे म्हणूनच नात्यांमध्ये जिवंतपणा आहे. तिचा सन्मान करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. तसेच महिलांमुळेच कुटुंब व्यवस्थेचा कणा मजबूत आहे असे प्रतिपादन स्त्रीरोग तज्ञ डॉ. मीरा देशपांडे यांनी केले आहे. तालुक्यातील सास्तूर येथील स्पर्श ग्रामीण रुग्णालयात बुधवारी (दि.८) जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या.
या कार्यक्रमास स्पर्श रुग्णालयाचे प्रकल्प अधिकारी रमाकांत जोशी, स्त्रीरोगतज्ञ डॉ. मीरा देशपांडे, डॉ. मैत्री तावशीकार, डॉ. अशोक मस्के, पडवळ मॅडम, श्री. पवार, ग्रामीण रुग्णालय स्पर्शच्या नर्स इन्चार्ज शिल्पा शिंदे, रुग्णालयातील सर्व महिला कर्मचारी, अधिपरिचारिका तसेच परिसरातील महिला उपस्थित होत्या.
प्रकल्प अधिकारी रमाकांत जोशी यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. ते म्हणाले की, खरे तर महिला या पुरुषापेक्षा जास्त कष्टाळू, कनवाळू असतात. तरी त्यांना अबला संबोधले जाते हे पटत नाही. महिलाचा कायमस्वरूपी दररोज सन्मानच झाला पाहिजे. प्रत्येक महान व्यक्तीच्या जीवनात आणि यशात स्त्रियांचा सिंहाचा वाटा आहे. संपूर्ण विश्वात भारतीय संस्कृती आदर्श ठरली आहे. ती या संस्कृतीतील स्त्रियांच्या अनन्य साधारण योगदानामुळे आणि म्हणूनच आजच्या जागतिक महिला दिनी मनुष्य जीवनात आनंद निर्माण करणाऱ्या समस्त महिला विषयी कृतज्ञता व्यक्त करू या असे आवाहन त्यांनी यावेळी केले. स्त्रीरोग तज्ञ डॉ. मैत्री तावशीकर म्हणाल्या की, निश्चितच स्त्रियांचा सन्मान झाला पाहिजे. तसेच स्त्रियांनी एकमेकीच्या नात्याचा आदर केला पाहिजे. एकमेकाबद्दल विश्वास वाढवला पाहिजे. तरच महिलांत एकी राहिल.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.