आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत कांस्यपदक मिळवून दिले; कुस्तीगीर मुलीच्या यशासाठी शेतकरी वडिलांचे प्रयत्न

कळंब4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुलीच्या कुस्तीपटू बनण्याच्या स्वप्नाला बळ देण्यासाठी शेतकरी बापाने शेतातील आलेले उत्पन्न त्या मुलीच्या प्रशिक्षणावर खर्च केले. या मुलीने त्याचे चीज करत राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत महाराष्ट्र राज्याला कांस्यपदक मिळवून दिले. कुस्तीमध्ये पदक मिळवणारी ही तालुक्यातील एकमेव मुलगी ठरली आहे. कळंब तालुक्यातील कोथळा येथील दशरथ शिंदे हे शेतकरी असून यांची मुलगी सोनाली शिंदे कोथळा येथील जिल्हा परिषद शाळेत नववी च्या वर्गात शिक्षण घेत आहे. ही मुलगी विविध खेळात चांगली खेळाडू असल्यामुळे शिक्षकांनी हिची खेळातील रुची ओळखली होती. सोनालीने रुग्बी स्पर्धेत २०१८ मध्ये सहभाग नोंदवला होता. स्कॉच स्पर्धेत २०१९ मध्ये राज्यात प्रथम क्रमांक पटकाविला होता. आट्यापाट्याच्या स्पर्धेत राज्यात प्रथम क्रमांक पटकाविला होता. कुस्तीच्या शालेय १४ वर्षाच्या वयोगटातील ३५ किलो वजनी गटात २०१९ मध्ये राज्यात तृतीय क्रमांक पटकावला होता.

तिला कुस्तीची आवड असल्यामुळे तिने स्कॉच व रग्बी या खेळाकडे न वळता कुस्तीला प्राधान्य दिले व या मध्ये कुटुंबातील सर्वांनी होकर दिला. मग तिने कै. महादेव गव्हार तालीम येडशी येथे अनिल अवधूत यांनी प्रशिक्षण दिले. पण तिचे स्वप्न मोठे असल्यामुळे वडिलांनी तिला निमगाव पुणे येथील प्रशिक्षण संस्था येथे पाठवले असून दोन वर्षापासून त्याच ठिकाणी प्रशिक्षण घेत आहे.

कळंब तालुक्यातील कोथळा येथील दशरथ शिंदे यांना तीन एकर जमीन आहे व ते शेळी पालन सुध्दा करतात. यातील आलेले उत्पन्न ते मुलगी सोनल हिच्यावर खर्च करतात, मुलीला वर्षाकाठी दिड लाख रुपये प्रशिक्षणावर खर्च होतो.

अनेकांचे मार्गदर्शन
पैलवान महादेव गव्हार कुस्ती संकुल येडशी येथे सराव करत असलेली सोनाली शिंदे हिने बिहार पटना येथे झालेल्या राष्ट्रीय पंधरा वर्षातील (जूनियर) राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत दिल्ली, हरियाणा ,उत्तर प्रदेश, हरियाणा, मध्य प्रदेश या कुस्तीगिरांचा पराभव करून उस्मानाबाद जिल्ह्याला व महाराष्ट्र राज्याला कांस्यपदक प्राप्त करून दिले. तिला तालमीचे अध्यक्ष बालाजी कानडे यांनी शुभेच्छा दिल्या. पैलवान शरद गव्हार, व कुस्ती कोच महाराष्ट्र चॅम्पियन पैलवान महादेव मेटकरी यांचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आ. कैलास घाडगे पाटील यांनी शुभेच्छा दिल्या.

बातम्या आणखी आहेत...