आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आंदोलन:बेडगा पुलाचे काम सुरू,शेतकरी सेनेने आंदोलन करण्याचा इशारा दिला होता

उमरगाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

उमरगा ते डिग्गी मार्गावरील रस्त्यावर बेडगा येथील ओढ्यावरील पुलाची उंची वाढवून नव्याने पुलाची बांधणी करावी, रस्त्यावरील पडलेले खड़े तात्काळ बुजवण्यात यावेत, या मागणीसाठी निवेदन देत रास्ता रोको आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर संबंधित विभागाने रस्त्याचे कामाला सुरुवात केल्याने आंदोलन स्थगित करण्यात आले असल्याचे पत्र देऊन सांगितले.महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेनेच्या वतीने उमरगा तहसील कार्यालय, सार्वजनिक बांधकाम उपविभाग व पोलिस ठाणे यांना देण्यात आलेल्या निवेदन देऊन त्यात म्हटले होते की, उमरगा ते डिग्गी रस्त्यावर बेडगा ओढ्यावरील फरसी पुल पाण्याच्या प्रवाहामुळे पूर्णपणे उद््ध्वस्त झालेला आहे. गेल्या चार वर्षांपासून प्रत्येक वर्षी धरणाचे पाणी रस्त्यावर येऊन रस्ता वाहतुकीसाठी पूर्णत: बंद होतो.

हा प्रकार दर वर्षीच्या पावसाळ्यात होत असल्यामुळे चार गावांचा त्यामधे डिग्गी, बेडगा, चंडकाळ. मानेगोपाळ गावांची वाहतूक पावसाळ्यामध्ये ठप्पच राहत आहे. याबाबत वेळोवेळी प्रशानाला लेखी व तोंडी तक्रारी करूनही अद्याप या पुलाचे बांधकाम नव्याने करण्यात आले नाही. मागील चार वर्षापासून फरसी पुलाची मंजुरी झाली असल्याचे वेळोवेळी प्रशासन, लोकप्रतिनिधी यांच्याकडून फक्त आश्वासने दिले जातात.

मात्र प्रत्यक्षात पुलाच्या कामास सुरूवात झाले नसल्याने हे काम तत्काळ पूर्ण करून या भागातील होणाऱ्या प्रवासी, विद्यार्थी आणि लोकांची गैरसोय थांबवावी व उमरगा पासुन ते डिग्गीपर्यंत रस्त्यावर पडलेले लहान-मोठे खड्डे तत्काळ बुजवून घ्यावे, अशी मागणी होती. पावसाळ्यात या रस्त्यावरून जाताना वाहने चालवणे धोकादायक बनते.

या मागणीसाठी १ नोव्हेंबर रास्ता रोको करण्याचा इशारा दिला असताना सोमवारी (दि. ३१) सार्वजनिक बांधकाम उपविभाग उमरगा यांनी उमरगा ते डिग्गी रोडवर पडलेले खड्डे बुजवण्याच्या कार्यास प्रत्यक्ष सुरुवात केलेली असून, नाला व तलावाचे पाणी कमी झाल्याबरोबर ओड्यावरील पुलाचे बांधकाम चालू करण्यात येणार असल्याचे लेखी आश्वासन दिले असल्याने महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेना यांच्या वतीने एक नोव्हेंबरला पुलावर होणारा रस्ता रोको रद्द करण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...