आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशहरात पैठण येथील श्री संत एकनाथ महाराजांच्या पालखीचे शनिवारी आगमन होत असून अद्यापही कुंभेफळ-पाचपिंपळा-पिंपरखेड पालखी मार्गाचे काम अर्धवट स्वरुपात असून मार्गावर खडी टाकण्यात आल्याने वारकऱ्यांची वाट बिकट झाली आहे. परंडा तालुक्यात कोरोनामुळे सलग दोन वर्ष पालखी सोहळे व दिंड्या आल्या नाहीत. श्रीसंत एकनाथ महाराजांची पालखी कुभेंफळ, पाचपिंपळा व पिंपरखेड मार्गे परंडा शहरात दाखल होते. पालखी मार्गाचे काम अर्धवट स्वरुपात झाले आहे. यामुळे पालखीत चालणाऱ्या वारकऱ्यांना अंथरलेल्या खडीचा पायांना मोठा त्रास होणार आहे. प्रशासनाच्या संबंधित विभागाचे व कंत्राटदाराचे कामाकडे दुर्लक्ष अाहे. यामुळे पालखीतील वारकऱ्यांची वाट बिकट होणार आहे. शहरातील पालखी व दिंड्या येणाऱ्या मार्गाची अत्यंत दुरावस्था झाली असून मोठमोठे खड्डे पडल्यामुळे पावसाळ्यात तर आनखीनच दुरावस्था झाली. नगर परिषद प्रशासनाकडून काही रस्त्यावर मुरुम टाकण्यात आला आहे.
दिंडीला ४२० वर्षाची परंपरा श्रीसंत एकनाथ महाराजांच्या पालखीचे नेतृत्व रघुनाथ नारायनबुवा पालखीवाले हे करत असून पालखी सोहळ्यास ४२० वर्षाची परंपरा आहे. पालखी सोबत २८ दिंड्या व २० हजार वारकरी आहेत.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.