आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवेदन‎:आजपासून उमरगा पालिका‎ कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन‎

उमरगा‎13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जुनी पेन्शन योजना लागू करण्यासह अन्य‎ मागण्यांसाठी राज्यातील शासकीय,‎ निमशासकीय कर्मचाऱ्यांनी मंगळवारपासून‎ (दि.१४) संपावर जाण्याचा निर्णय घेतला‎ असून उमरगा नगरपरिषदेचे कर्मचारी यात‎ सहभागी होणार आहेत. यासंबंधी‎ मुख्याधिकारी रामकृष्ण जाधवर यांना निवेदन‎ देण्यात आले.‎ दरम्यान, संपात अत्यावश्यक सेवेतील‎ कर्मचारी सहभागी होणार असल्याने सेवा‎ कोसळण्याची शक्यता आहे. निवेदनात म्हटले‎ आहे की, नगरपरिषद, नगरपंचायती, संवर्ग‎ अधिकारी, स्थानिक नगरपरिषद कर्मचारी,‎ रोजंदारी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या, जुनी‎ पेन्शनबाबत नगरपरिषद संचालनालयाला‎ वेळोवेळी निवेदन देण्यात आले. नगरविकास‎ मंत्र्यांसोबत बैठक होऊनही मागण्या प्रलंबित‎ आहेत.

संघटनांमार्फत वेळोवेळी निवेदन सादर‎ करून विनंती करून शासनाने कोणतेही‎ सकारात्मक निर्णय घेतले नाहीत. राज्यातील‎ संघटनांनी एकत्रित येऊन महाराष्ट्र राज्य‎ नगरपालिका महासंघ तयार केला आहे.‎ कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर कोणताही निर्णय‎ होत नसल्याने १३ मार्च रोजी काळ्या फिती‎ लावून शासनाचा निषेध व्यक्त करण्यात‎ आला. १४ मार्चपासून नगरपरिषदेच्या सफाई‎ कामगार व अत्यावश्यक सेवांसह इतर सेवेतील‎ कर्मचारी बेमुदत संपावर जात असल्याचे या‎ निवेदनात म्हटले आहे. निवेदनावर नगरपरिषद‎ कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष एस. एच. भोसले,‎ उपाध्यक्ष टी. बी. वऱ्हाडे, सचिव के. एस.‎ शिरगुरे, व्ही. एम. क्षीरसागर, एम. एम. सरपे,‎ पी. एस. सौंदर्गे यांच्यासह सफाई कामगार व‎ कर्मचाऱ्यांच्या स्वाक्षरी आहेत.‎

बातम्या आणखी आहेत...