आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मार्गदर्शन:कार्याध्यक्ष मेदने यांचा‎ शिक्षक संघात प्रवेश‎

वाशी‎24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्हा शिक्षक समिती संघटनेचे‎ कार्याध्यक्ष असलेले प्रा. शिक्षक‎ मुकुंद मेदने यांनी बुधवारी (दि.१)‎ शिक्षक संघटनेत प्रवेश केला.‎ शिक्षक संघटनेचे तालुकाध्यक्ष‎ संतोष मोळवणे यांच्या नेतृत्वावर‎ विश्वास ठेवत मेदने यांनी कर्मवीर‎ भाऊराव पाटील शिक्षक सहकारी‎ पतसंस्थेच्या येथील कार्यालयात‎ आयोजित कार्यक्रमात प्रवेश केला.‎ याप्रसंगी प्रा. शिक्षक संघाचे राष्ट्रीय‎ उपाध्यक्ष बाळकृष्ण तांबारे, राज्य‎ चिटणीस भक्तराज दिवाणे आवर्जून‎ उपस्थित होते. कार्यक्रमात संघाची‎ कार्य करण्याची दिशा व त्यातून‎ शिक्षकांना होणारा फायदा,‎ अडचणींवर होणारी मात, याबाबत‎ मार्गदर्शन करण्यात आले.

यावेळी‎ भाऊराव पाटील पतसंस्थेचे‎ चेअरमन विठ्ठल माने, संघाचे‎ कळंब तालुकाध्यक्ष दत्तात्रय पवार,‎ मुक्ताई पतसंस्थेचे महादेव‎ मेणकुदळे, कल्याण सुरवसे,‎ आश्राजी कावळे, संगपाल सुकाळे,‎ वाघिश स्वामी, राजकुमार गुंजाळ,‎ दत्तात्रय डिसले, सखाराम शिंदे,‎ शिवशंकर राऊत, बाबुराव माने,‎ बालाजी ढाणे, सुधीर उंदरे, चंद्रकांत‎ भराटे, सिद्धेश्वर भालेकर, सिद्धेश्वर‎ जाधव, बाळासाहेब डोरले, प्रवीण‎ कुंभार, ज्ञानेश्वर जानगेवाड, प्रशांत‎ जाधवर यांच्यासह तालुक्यातील‎ शिक्षक संघाचे सदस्य आदींची‎ याप्रसंगी प्रामुख्याने उपस्थिती होती.‎

बातम्या आणखी आहेत...