आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कार्यशाळा:मोडनिंबच्या ग्रामपंचायतीत दिव्यांगांकरिता कार्यशाळा

मोडनिंब2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील ग्रामपंचायत कार्यालयात आयोजित दिव्यांग कार्यशाळेत शासनाच्या अनेक योजनांबाबत मार्गदर्शन करण्यात आले. पंचायत समिती कुर्डुवाडीचे विस्तार अधिकारी ज्ञानेश्वर सुतार यांनी मार्गदर्शन केले. दिव्यांग बांधवांकरिता असलेल्या शासनाच्या विविध योजनांची यावेळी माहिती देण्यात आली. सरपंच लक्ष्मी पाटील व सदस्यांच्या हस्ते दिव्यांग बांधवांचा गुलाबपुष्प देऊन सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक दत्तात्राय सुर्वे यांनी केले. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष कैलास तोडकरी, उपसरपंच अमित कोळी, ग्रामविकास अधिकारी शिवाजी रकटे, अनिल शिंदे, अतुल गाडे, राहुल पाटील आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...