आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशिवाई चॅरिटेबल ट्रस्ट्स कॉलेज ऑफ फार्मसी, कोरेगाववाडी व उपजिल्हा रुग्णालयाच्या संयुक्त विद्यमाने जागतिक एड्स दिनानिमित्त गुरूवारी महा जनजागृती फेरी काढण्यात आली.
शहरातील छत्रपती शिवाजी महाविद्यालयापासून ते हुतात्मा स्मारका दरम्यान काढण्यात आलेल्या फेरीत कॉलेज ऑफ फार्मसीचे विद्यार्थी जनजागृती पोस्टर घेवून सहभागी झाले होते. यावेळी विद्यार्थ्यांनी एड्स रोगावरील प्रतिबंधक फलक तयार केले होते. तसेच ‘उपचारापेक्षा प्रतिबंध उत्तम’ आशा घोषणा देण्यात आल्या. फेरीनंतर महाविद्यालयामध्ये आयोजित एड्स जनजागृती विषयावर चर्चा सत्र आयोजित करण्यात आली. विद्यार्थी पद्मजा मुकडे, वैष्णवी भारती या विद्यार्थिनींनी एड्स रोगाविषयी माहिती व प्रतिबंधात्मक उपाय याविषयी माहिती सादर केली. यावेळी प्राचार्य महेश कदारे म्हणाले की,आजचा युवक व्यसनाच्या व आजारांच्या विळख्यात अगदी सहजपणे गुंतत चाललाय.
अंमली पदार्थ, असुरक्षित संबंध, सेल्फ मेडिकेशनमुळे आजची तरुण पिढी त्रस्त आहे. यातून युवकांची सुटका करायची असेल तर त्यांचे समुपदेशन करणे गरजेचे आहे.योग्य वेळी समुपदेशन झाले तर एड्स सारखा दुर्धर आजार सुध्दा नियंत्रित करता येईल असे ते म्हणाले.यासाठी प्रा अजय बेडदुर्गे, प्रा परीक्षित शिरूरे, प्रा वैष्णवी इंडे,प्रा प्राजक्ता ननवरे,महेश थोरे यांच्या सह प्राध्यापक, शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते. प्रा. वैष्णवी इंडे यांनी सूत्रसंचलन करून आभार मानले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.