आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सत्कार:तुळजाभवानी प्राथमिक विद्यालयात जागतिक दिव्यांग दिन साजरा

तुळजापूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तुळजाभवानी प्राथमिक विद्यालयात जागतिक दिव्यांग दिन साजरा करण्यात आला. या प्रसंगी शाळेतील दिव्यांग विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.प्रारंभी शाळेच्या मुख्याध्यापिका सुरेखा इगवे यांचा हस्ते प्रतिमा पूजना करण्यात आले.यावेळी बोलताना मुख्याध्यापिका इगवे यांनी दिव्यांग व्यक्ती अथवा त्यांच्या पालकांनी कोणत्याही प्रकारचा कमीपणा किंवा न्यूनगंड न बाळगता आत्म सन्मानाने पुढे आले पाहिजे, दिव्यांग व्यक्ती कुठल्याही प्रकारची जिम्मेदारीस घाबरत नाही. तो अधिक आत्मविश्वासाने आपले काम चोख बजावतो असे गौरवोद्गार काढले.

यावेळी रुही खान, आरुषी इटकर, रमेश शिंदे, तृप्ती सूर्यवंशी, अनुसया जाधव, शाकंभरी सूर्यवंशी, प्रणाली शितोळे, विराट सोनवणे आदी विद्यार्थ्यांचा गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला. आभार खंडू ताटे यांनी मानले. कार्यक्रमाला शिवाजी पवार, गोरखनाथ काळे, मोमीन आरिफ, संजय रसाळ आदी शिक्षकांसह विद्यार्थी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...