आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जनजागृती फेरी:एकुरगा शिवशक्ती विद्यालयात जागतिक दिव्यांग समता दिन

उमरगा2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तीन डिसेंबर दिवस जागतिक स्तरावर दिव्यांग दिन म्हणून साजरा केला जातो. तालुक्यात एकुरगा येथील श्री शिवशक्ती विद्यालयात शनिवारी (दि.३) जागतिक दिव्यांग दिन विविध उपक्रमातून साजरा करण्यात आला.या कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी मुख्याध्यापक प्रकाश बोंडगे होते.दिव्यांग व्यक्तीबाबत सामान्य जनतेत जनजागृती निर्माण होण्यासाठी गावातून घोषणा देत फेरी काढण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांनी आपली मनोगत व्यक्त केली. यावेळी ज्येष्ठ शिक्षक अजित साळुंके म्हणाले की, दिव्यांगांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी समाजाचा सहभाग गरजेचा आहे. चांगल्या व्यक्तींनी आपण समाजाचे देणे लागतो, ही भावना बाळगून दुर्बल व्यक्तीस मदत करत रहाणे आवश्यक आहे.

एखाद्या दिव्यांगांना मदत करतांना सहानुभूती वाटू नये, अशाप्रकारे सहभाग असावा. शिवाय शीघ्र निदान व शीघ्र उपचार संकल्पना दिव्यांगांस चांगल्या रितीने राबवून दिव्यांगांना मुख्य प्रवाहात आणण्याची गरज असल्याचे सांगितले. यावेळी धनराज पाटील यांचेही भाषण झाले. यावेळी दिव्यांग विद्यार्थी नागेश करके, आकाश कुंभार, विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.

प्रकाश बाेंडगे यांनी दिव्यांग विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देत शिक्षणाच्या मूळ प्रवाहात समाविष्ट करून घेणे गरजेचे असल्याचे आहे. आपण सर्व समान आहोत आणि म्हणूनच आपल्या सर्वांना समान वागणूक दिली पाहिजे. आपण दिव्यांग विद्यार्थी अन् लोकांशी उर्वरित लोकसंख्येच्या बरोबरीने वागू. आज अशी सर्वांनी शपथ घेवू असे आवाहन केले. कार्यक्रमास शिक्षक, सेवक, विद्यार्थी उपस्थित होते. विजया गायकवाड यांनी सूत्रसंचालन केले. सिद्धेश्वर वाकडे यांनी आभार मानले.

बातम्या आणखी आहेत...