आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नळदुर्ग किल्ला:स्वच्छता मोहिमेने जागतिक वारसा सप्ताहास प्रारंभ ; विविध कार्यक्रमांचे आयोजन

नळदुर्ग18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील ऐतिहासिक किल्ल्यात शनिवारी (दि.१९) स्वच्छता मोहीम राबवून जागतिक वारसा सप्ताहास सुरुवात करण्यात आली. राज्य सरकारच्या निर्देशानुसार राज्य पुरातत्व विभाग व युनिटी मल्टिकॉन्सच्या संयुक्त विद्यमाने १९ ते २५ नोव्हेंबर दरम्यान नळदुर्ग किल्ल्यावर जागतिक वारसा सप्ताह साजरा करण्यात येणार आहे.

या कालावधीत किल्ल्यामध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. तसेच यावेळी किल्ल्यावर (स्मारकाच्या) ठिकाणी विद्युत रोषणाई, स्वच्छता मोहीम, वारसा स्थळ पदयात्रा काढण्यात येणार आहे. १९ नोव्हेंबर रोजी युनिटी मल्टिकॉन्सचे व्यवस्थापकीय संचालक कफिल मौलवी यांच्या मार्गदर्शनाखाली किल्ल्यात स्वच्छता मोहिम राबवून जागतिक वारसा सप्ताहास प्रारंभ करण्यात आला.

यावेळी पुरातत्व विभागाचे नागनाथ गवळी, किल्ल्यातील युनिटी मल्टिकॉन्सचे व्यवस्थापक जुबेर काझी, जनसंपर्क अधिकारी विनायक अहंकारी, हाजी मलंग शेख, उमेर शेख यांच्यासह किल्ल्यातील कर्मचारी उपस्थित होते. ऐतिहासिक वारशाप्रती नागरिकांमध्ये आत्मियता आदरभाव निर्माण व्हावा, यासाठी शासनाच्या वतीने जागतिक वारसा सप्ताह साजरा करण्यात येत आहे. या सप्ताहामुळे नळदुर्गचा ऐतिहासिक किल्ला उजळून निघणार आहे. या सप्ताहानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या सर्व कार्यक्रमात युनिटी मल्टिकॉन्स कंपनीतर्फे शहरातील अधिकाधीक नागरिकांना सहभागी करुन घेण्यात येणार आहे.

बातम्या आणखी आहेत...