आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अणदूर:अणदूरमध्ये जागतिक योगदिनी प्रात्यक्षिके सादर

अणदूर3 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील जवाहर महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजना,जवाहर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या वतीने जवाहर महाविद्यालयाच्या प्रांगणात आंतरराष्ट्रीय योगदिन साजरा करण्यात आला. येथे मंगळवार दि.२२ रोजी योगदिनाची सुरुवात तपोरत्न कुमार स्वामीजी यांच्या प्रतिमा पूजनाने व संस्कृत श्लोक पठण करून करण्यात आली.

या कार्यक्रमास महाविद्यालय विकास समितीचे रामचंद्र आलुरे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. उमाकांत चनशेट्टी, मुख्याध्यापक सुरेश ठोंबरे, लातूर एनसीसीचे कमांडर प्रकाश मौर्य, उपप्राचार्य एम.एम.लंगडे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी योग प्रात्यक्षिक कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ. सूर्यकांत आगलावे, प्रा.डॉ.बिराजदार व क्रीडाशिक्षक जयहिंद राठोड यांनी करून दाखविले. योग दिनास जवाहर विद्यालय, उच्च माध्यमिक विद्यालय व महाविद्यालयाचे विद्यार्थी तसेच गावातील आजी-माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी विविध आसने करून दाखविण्यात आली.

आरोग्य केंद्रात योग दिन
येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आंतरराष्ट्रीय योगदिन साजरा करण्यात आला. येथे मंगळावर दि.२१ रोजी आरोग्य केंद्रात नेत्र चिकित्सा अधिकारी सी.एस.महिंद्रकर यांनी दक्षिणायनचे महत्व सांगून योग व प्राणायामची प्रात्यक्षिके करून दाखवली. यावेळी आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी चंद्रकांत मुंडे,आरोग्य सहाय्यक डी.आर.कदम यांच्यासह सर्व कर्मचारी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...