आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गौरव पुरस्कार:कुस्तीतील वामन गाते जीवन गौरव पुरस्कार प्रसाद निंबाळकर यांना प्रदान

तेर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

दरवर्षी प्रमाणे याही वर्षी पै.वामन दादा गाते यांच्या नावाने दिला जाणारा कुस्ती क्षेत्रातील उत्कृष्ट खेळाडू जीवन गौरव पुरस्कार प्रसाद निंबाळकर यांना देऊन गौरविण्यात आले.तेर येथील उद्योजक बालाजी बनकर यांनी आयोजित हा कार्यक्रम आयोजित केला होता. या पुरस्काराचे स्वरूप सन्मानचिन्ह, फेटा, शाल, श्रीफळ व रोख रक्कम असे होते.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुस्तीगीर परीषदेचे कार्याध्यक्ष संतोष नलावडे, तर प्रमुख पाहुणे म्हणून शिवाजीराव धुमाळ होते.

सुर्यकांत टेकाळे, जिल्हा क्रिडा आधिकारी मिरा रायबान, तालुका क्रिडा आधिकारी सारिका काळे, कार्यक्रमाचे आयोजक तेर येथील उद्योजक बालाजी बनकर, वामन गाते, काकडे, गणेश साप्ते, संजय जाधव, दिनकर जाधवर, वस्ताद केंद्रे, खरमाटे सर यांची उपस्थितीत हा जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...