आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातालुक्यातील दाबका, मुळज, कदमापूर परिसरात अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे तालुका कृषी कार्यालय आणि तहसील कार्यालयामार्फत पंचनामे करून संयुक्त अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठवण्यात आला आहे. वरिष्ठ कार्यालयाकडून निधी प्राप्त होताच तहसील कार्यालयातर्फे अनुदान वाटप करण्याची दक्षता घेण्याचे लेखी पत्र तालुका कृषी अधिकारी सागर बारवकर यांनी दिल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले असल्याचे उपोषणकर्ते बाळासाहेब माने यांनी सांगितले.
दोन दिवस झालेल्या उपोषणात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष रामेश्वर सूर्यवंशी यांनी पाठिंबा देत सहभागी झाले होते. यामध्ये अखिल भारतीय छावा संघटनेचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब माने, महावीर पाटील, सरपंच सौ. कुसूमताई मुटले, महेश भोसले, भगवान शिंदे, उषा बंडगर, सलीम मासूलदार,आबा चव्हाण, मधुकर मुटले, मुक्ताबाई जाधव, प्रभावती बनसोडे, अनुसया बनसोडे, शांताबाई मोरे, प्रयागबाई लिंबारे, झिंगुबाई कांबळे, धनराज इंगळे, भागवत जाधव, तुकाराम जाधव, लक्ष्मण तेलंग यासह नुकसानग्रस्त शेतकरी आंदोलनात सहभागी झाले होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.