आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बदली:चुकीची माहिती, 12 शिक्षकांचे अर्ज रद्द ; ग्रामविकास विभागाच्या आदेशावरून कारवाई होणार

उस्मानाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांची बदली प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. यामध्ये खोटी माहिती देऊन बदलीचा लाभ मिळवण्याचा प्रयत्नही केला जात आहे. यामध्ये खोटी माहिती देणाऱ्या १२ शिक्षकांचे फॉर्म रद्द करण्यात आले आहेत. त्यांची ग्रामविकास विभागाच्या आदेशावरून चाैकशी करण्यात आली आहे. आता त्यांच्यावर काय कारवाई होणार याकडे लक्ष लागले आहे.

राज्यस्तरावर आंतरजिल्हा बदली प्रक्रिया पार पडल्यानंतर आता एकात्मिक पद्धतीने त्या त्या जिल्ह्यात जिल्हाअंतर्गत बदली प्रक्रिया करण्यासाठी ऑनलाईन प्रणालीद्वारे प्रक्रिया करण्यात येत आहे. यासाठी टीचर्स ट्रान्सफर मॅनेजमेंट सिस्टिमवर शिक्षकांना ऑनलाइन माहिती भरण्याचे आदेश दिले आहेत. यासाठी पहिल्यांदा संवर्ग-१ मधील दिव्यांग, असाध्य आजाराने त्रस्त आदी शिक्षक किंवा नातेवाईक अशा कॅटेगरीतील असलेल्या शिक्षकांनी माहिती सादर केली होती. अशी माहिती भरून ४८१ शिक्षकांनी बदली मागितली. तसेच संवर्ग-२ मधील पती किंवा पत्नी शिक्षक असलेल्या ८९ जणांनी बदली मागितली आहे. याची छाननी २८ नोव्हेंबरला करण्यात आली.

यामध्ये संवर्ग-१ मध्ये तीन तर संवर्ग-२ मधील तब्बल नऊ गुरुजींना चुकीची माहिती भरून बदलीत लाभ उठवण्याचा प्रयत्न केल्याचे निदर्शनास आले आहे. याचा अहवाल मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता, शिक्षणाधिकारी रामलिंग काळे यांच्या मान्यतेने बदली नोडल अधिकारी सुरेश वाघमारे यांनी वरिष्ठ स्तरावर पाठवला आहे. आता पहिली प्रक्रिया म्हणून त्यांचे फॉर्म पोर्टलवरून डिलीट करून रद्द करण्यात आले आहेत. यामुळे त्यांची आता त्यांच्या मनाजोगे स्थान न देताच बदली होईल. शिक्षण विभाग उरलेल्या जिल्ह्यातील कोणत्याही शाळेत पाठवू शकतो. तसेच त्यांच्यावर नेमकी कोणती कारवाई होणार यासंदर्भात ग्रामविकास विभाग निर्णय घेणार आहे.

बातम्या आणखी आहेत...