आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यश:दहावीचा निकाल गतवर्षीपेक्षा 2.23 टक्क्यांनी घसरला, परंतु, 2020 पेक्षा उत्तम कामगिरी

उस्मानाबाद10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

गतवर्षीपेक्षा दहावीच्या उत्तीर्णांचा टक्का २.२३ ने घसरला असून २०२० पेक्षा चांगलाच वधारला आहे. ऑनलाईन शिक्षण व ऑफलाईन परिक्षा असतानाही यावर्षी ९७.९४ टक्के निकाल लागला आहे. गतवर्षी ९९.९७ टक्के तर २०२० मध्सये ९४.८५ टक्के निकाल होता. विशेष म्हणजे यावेळी विशेष प्राविण्यासह उत्तिर्ण झालेल्यांची संख्याच अधिक आहे. नेहमीप्रमाणे उत्तिर्णांमध्ये मुलींचा टक्का सरस आहे. कोरोनाच्या प्रभावामुळे शाळा कधी सुरू तर कधी बंद असायची. यामुळे विद्यार्थ्यांना सर्वस्वी ऑनलाईन शिक्षणावरच अवलंबून राहावे लागले होते. अनेकांनी दहावीची परिक्षाही ऑनलाईन घेण्याची मागणी केली होती. मात्र, शिक्षण विभागाने सर्व विरोध झुगारत परिक्षा प्रत्यक्ष नियमित घेतली. तरीही विद्यार्थ्यांची जबरदस्त कामगिरी केली असून जिल्ह्याचा यावर्षीचा निकाल ९७.८४ टक्के लागला आहे. गतवर्षी तर कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे परिक्षाच रद्द करण्यात आली हाेती. मुल्यमापनाच्या आधारावर ९९.९७ टक्के निकाल लागला होता. यावेळी २.१३ टक्के निकाल कमी लागला असला तरी विद्यार्थ्यांची कामगिरी चांगली आहे. कारण, २०२० मध्ये ९४.८५ टक्के निकाल लागला होता. त्यापेक्षा हा निकाल सरस आहे. यावर्षी २१ हजार ८१७ परिक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांपैकी २१ हजार ३४७ जण उत्तिर्ण झाले आहेत. यामध्ये ११ हजार ९६५ मुलांपैकी ११ हजार ६४० जण उत्तिर्ण झाले असून यांचा टक्का ९७.२८ टक्के आहे. तसेच ९८५२ मुलींपैकी ९७०७ जणी उत्तिर्ण झाल्या आहेत. यांचा टक्का ९८.५२ आहे. एकूण २२ हजार २२५ विद्यार्थ्यांनी परिक्षा फॉर्म भरला होता. परंतु, ४०८ विद्यार्थी गैरहजर राहिले होते. दरम्यान, यावर्षी प्रत्येक शाळेत परिक्षा केंद्राची व्यवस्था करण्यात आली होती.

विशेष प्रावीण्यात १२ हजारांपेक्षा अधिक विशेष प्राविण्यात उत्तिर्ण होणाऱ्यांची संख्या यावेळी सर्वाधिक आहे. निम्म्यापेक्षा अधिक विद्यार्थी विशेष प्राविण्यात अर्थात डिस्टेंग्शनमध्ये १२ हजार ४८३ विद्यार्थी आहेत. पहिल्या श्रेणीत ६३२६, द्वितीय श्रेणीत २२४४ तर तृत्तिय श्रेणीत केवळ २९४ विद्यार्थी उत्तिर्ण झाले आहेत. निम्म्यापेक्षा अधिक विद्यार्थी विशेष उत्तिर्ण होण्याचा हा विक्रमच म्हणावा लागेल.

लातूर विभागात जिल्हा अव्वल महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या लातूर विभागात लातूरस उस्मानाबाद व नांदेड जिल्ह्याचा समावेश आहे. या तीन्ही जिल्ह्यात उस्मानाबाद जिल्हा अव्वल ठरला आहे. नांदेडची उत्तिर्णांची टक्केवारी ९६.६८ तर लातूरची टक्केवारी ९७.६३ आहे. उस्मानाबादने दोघांनाही मागे टाकले असून उस्मानाबादची टक्केवारी ९७.८४ टक्के आहे.

भूम तालुक्याचा निकाल सर्वाधिक भूम तालुक्याचा सर्वाधिक निकाल लागला असून ९९.१४ टक्केवारी आहे. त्यानंतर परंडा तालुक्याने बाजी मारली असून याची टक्केवारी ९८.७५ आहे. त्याखालोखल उस्मानाबाद ९८.६२, कळंब ९७.६१, उमरगा ९७.५८, लोहारा ९६.८६, तुळजापूर ९६.६६ तर वाशीचा सर्वाधिक कमी ९६.६१ टक्के निकाल लागला आहे.

रिपिटर्सचीही चांगली कामगिरी रिपिटर्सनीही यावर्षी चांगली कामगिरी केली आहे. जिल्याचा निकाल ८०.५८ टक्के लागला आहे. परिक्षेला बसलेल्या ६८० पैकी ५४८ विद्यार्थी उत्तिर्ण झाले आहेत. यामध्ये विशेष प्राविण्यात ३२, पहिल्या श्रेणीत ३६, दुसऱ्या श्रेणीत २३ विद्यार्थी उत्तिर्ण झाले आहेत. तिसऱ्या श्रेणीत उत्तिर्ण होणाऱ्यांची संख्या सर्वाधिक असून ४५७ जण आहेत.

{प्रत्येक पेपरनंतर एक दिवसांचा खंड देऊन दुसरा पेपर घेतला. {नियोजित वेळेपेक्षा १५ दिवसांच्या विलंबाने परीक्षा सुरू केली. {७५ टक्के अभ्यासक्रमावर आधारित परीक्षा घेतली. {किमान ४० टक्के प्रात्याक्षिकांवर आधारित परीक्षा घेतली. {शाळा तेथे उपकेंद्र देण्यात आले होते. पूर्वीचे केंद्रही तसेच होते. {लेखी परीक्षा देण्यासाठी ३० मिनिटे अधिकचा वेळ देण्यात आला.

बातम्या आणखी आहेत...