आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुंदर पेंटिंगबद्दल अमेझिंग​​​​​​​ ब्रिलियंट्स म्हणून नोंद:यशवंत ढगे याची किंग बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद

उस्मानाबाद25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील श्रीपतराव भोसले कनिष्ठ महाविद्यालयात इयत्ता बारावीमध्ये शिक्षण घेत असलेला विद्यार्थी यशवंत सुनील ढगे याची किंग बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये अमेझिंग ब्रिलियंन्स म्हणून नोंद झालेली आहे. यशवंत ढगे याने छत्रपती शिवाजी महाराज यांचे ॲक्रॅलिक कॅनव्हास वर १० बाय ७ आकाराचे पेंटींग साकारले आहे. याबद्दल किंग बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये अमेझिंग ब्रिलियंट्स म्हणून निवड झालेली आहे.या जागतिक अशा पुरस्कारामुळे उस्मानाबाद जिल्ह्य़ाची नोंद जागतिक पातळीवर झालेली आहे. त्यामुळेच शिवराज्याभिषेक सोहळा समिती उस्मानाबाद यांचे तर्फे यशवंत ढगे यांचा सत्कार करण्यात आला. नवनवीन कलाकारांना प्रोत्साहन मिळावे,मुलांच्या कलागुणांना वाव मिळावा,तरूण कलाकारांनी प्रेरणा घ्यावी या उद्देशाने समितीने सुनील ढगे यांचे शाल,श्रीफळ,पुष्पगुच्छ व पुस्तके देऊन कौतुकपर अभिनंदन केले आहे.

यावेळी शिवराज्याभिषेक सोहळा समितीचे अध्यक्ष शशिकांत खुने,सचिव दत्तात्रेय साळुंके,सुनिल मिसाळ,दत्ता जावळे,नितीन फंड,ओमकार शितोळे,राजकुमार ढोबळे,धनंजय साळुंके,रमेश यादव,संजय डोंगरे,मनोज मोरे,इ.पदाधिकारी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...