आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराउस्मानाबाद तालुक्यातील ढोकी येथील श्रीगुरुदेव दत्तात्रेयांच्या जन्मोत्सावानिमित्त दत्त टेकडीवरील दत्त मंदिरात, स्वामी समर्थ मंदिर, श्रीराम मंदिर तसेच गोवर्धनवाडी येथील सद्गुरु भगवान बाबा यांच्या आश्रमातही दत्त जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबराच्या जयघोषात भाविकांनी फुललेल्या दत्त टेकडीवर बुधवार दि.०७ रोजी श्रीगुरुदेवदत्तांच्या जन्मोत्सवानिमित्त श्रीदत्तमंदिरास आकर्षक रोषणाई व फुलांनी सजवले होते. पहाटे श्री गुरुदेव दत्तांची आभिषेक महापूजा करण्यात आली.त्यानंतर भजनाचा कार्यक्रम संपन्न झाला. सायंकांळी ५ ते ६ यावेळेत ह.भ.प. शिवाजी नाना घाडगे महाराज यांच्या काल्याच्या किर्तनानंतर महाआरती करण्यात आली.त्यानंतर दत्तगुरुंच्या पालखीची परिक्रमा काढण्यात आली.यानंतर दत्तजन्मोत्सव सोहळा संपन्न झाला. ढोकीसह परिसरातील तेर,तडवळे,वाखरवाडी,तुगांव,रुई,कावळेवाडी,गोवर्धनवाडी,ढोराळा,कोल्हेगांव,माळकरंजा,देवळाली या परिसरातील हजारो भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. यावेळी उपस्थित भाविकांनी महाप्रसाद घेतला.
६१ दात्यांनी केले रक्तदान दत्तजन्मोत्सवानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. उस्मानाबाद येथील रेणुका ब्लड सेंटरच्याच्यावतीने रक्तसंकलन करण्यात आले.यावेळी ६३ भक्तांनी रक्तदान केले.
बालगोपाळांनी लुटला यात्रेचा आनंद दत्तजयंतीनिमित्त मंदिराच्या पायथ्याशी यात्रा भरते. यात्रेत विविध खाद्यपदार्थाचे स्टाँलही लागल्याने यात्रेकरुंनी यात्रेचा मनमुराद आनंद लुटला. तसेच खेळणीची दुकाने व इतर गरजे उपयोगी दुकानांनी यात्रेत रंगत भरली होती तसेच महंत सद्गुरु भगवान बाबा आश्रमात दत्त जयंती साजरी उस्मानाबाद तालुक्यातील गोवर्धनवाडी येथील महंत सद्गुरु भगवान बाबा यांच्या आश्रमात दत्त जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. ह.भ.प. गंगाधर घाडगे महाराज यांच्या गुलालाच्या कीर्तनाने जयंती उत्सव साजरा करण्यात आला.यावेळी मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते. महाप्रसादनंतर दत्त जयंती समारोपाची सांगता करण्यात आली.
स्वामी समर्थ मंदिरात दत्तजन्मोत्सव साजरा येथील समर्थ नगरातील स्वामी समर्थ मंदिरातही दत्तजयंती साजरी करण्यात आली.दत्तनामांचा व स्वामीनामाच्या जयघोषात दत्तजन्मोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी परिसरातील भाविकांची उपस्थिती होती. भाविकांसाठी आर.के.ग्रुपच्यावतीने पाण्याची सोय करण्यात आली.गेल्या आठ वर्षापासून ग्रुपच्यावतीने पाणीपुरवठा करण्यात येतो.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.