आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कार्यक्रम:येडशी ग्रा.पं. निवडणुकांसाठी आरक्षण सोडतीचा कार्यक्रम ; अनुसुचित जातीच्या राखीव जागेसाठी जागांची संख्या दोन

येडशी23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

उस्मानाबाद तालुक्यातील येडशी येथे दि(६) सोमवार रोजी प्रियदर्शनी मंगल कार्यालय येथे ग्रामपंचायती च्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आरक्षण सोडतीचा कार्यक्रम घेण्यात आला . या वेळी लहान मुलांच्या हस्ते लॉटरी पद्धतीने प्रभागनिहाय आरक्षण सोडत घेण्यात आली. या मध्ये प्रभाग क्रं .तीन व चार अनुसुचित जातीच्या राखीव जागेसाठी जागांची संख्या दोन,व अनुसूचित जाती स्त्री राखीव जागा(सोडतीनुसार)प्रभाग क्रं ०४,अनुसूचित जमातीच्या राखीव जागा जागांची संख्या दोन प्रभाग क्रमांक ०५,०६, अनुसूचीत जमाती स्त्री राखीव जागा (सोडतीनुसार) प्रभाग क्रमांक ०६, सर्वसाधारण स्त्री राखीव जागा (सोडतीनुसार) जागांची संख्या ७ प्रभाग क्रंमाक१,२,३,३,४,५,६, सर्वसाधारण जागा जागांची संख्या ०६,प्रभाग क्रमांक १,१,२,२,४,६, या प्रमाणे लॉटरी प्रभाग निहाय पद्धतीने निवड करण्यात आले या वेळी मंडळ अधिकारी एन. डी.नागटिळक,ग्रामविकास अधिकारी संजय आडे,तलाटी बालाजी गरड, सरपंच गोपाळ नागटीळक, उपसरपंच राहुल पताळे, पंचायत समिती सभापती उस्मानाबाद संजय लोखंडे , शिवसेना उपजिल्हाप्रमुख विजयकुमार सस्ते, सुधीर सस्ते, शशांक सस्ते, संतोष डुमने, ग्रा सदस्य पंकज शिंन्दे ,अनिल कोरे,अमोल ठाकर सुनिल शेळके, उपस्थित होते .

बातम्या आणखी आहेत...