आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तिरंगी लढत:येडशीचा कारभार डॉक्टर महिलेच्या हाती

येडशी2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

येडशीच्या सरपंचपदी येडशी विकास पॅनलच्या डॉ. सोनिया प्रशांत पवार तर त्याचे पती प्रभाग ६ मधून त्याचे पती प्रशांत पवार विजयी झाल्याने पती पत्नी ग्रामपंचायतीमध्ये दिसणार आहेत.येडशी ग्रामपंचायत निवडणुकीत महाविकास आघाडी, भाजप प्रणित रामलिंग ग्रामविकास पॅनल व येडशी विकास पॅनल अशी तिरंगी लढत झाली.

यामध्ये अपक्ष निवडणूक लढवणाऱ्या डॉ. सोनिया प्रशांत पवार यांनी २१७५ मते मिळवून सरपंच पदी विजयी झाल्या तर महाविकास आघाडीच्या शीतल जयत भोसले यांना १८९० तर भाजप प्रणित रामलिंग पॅनल च्या नीता गजानन नलावडे यांना १७२५ मते मिळवून तिसऱ्या क्रमांकावर राहिल्या. सरपंच सोनिया पवार यांचे पती डॉ. प्रशांत हरिश्चंद्र पवार हे प्रभाग ६ मधून ४२१ मते घेवून निवडून आले.

महाविकास आघाडीने ९ जागा जिंकल्या. यामध्ये प्रिया शशांक सस्ते ३९३ ,स्वाती सुनील शेळके ३४०, प्रताप दामोदर ढोणे ४२३, सीमरन फारूक सिकलकर ५१६ ,सारिका मच्छिंद्र पवार ५६२ शिदे मिथुन रामलिंग ६८७ ,सुनिल अशोक पाटील ४९१ ,शिदे मंजुषा दत्तात्रय ४७५ ,सरोज सतोष पवार ६६७ मते घेवून विजयी झाले. भाजप प्रणित रामलिंग ग्रामविकास पॅनल चे महेश शितल पवार ४३४ ,मगेश रामचंद्र देशमुख ३६७ ,लता विलास तौर ४६८ ,तुषार शहाजी शिदे ३४५ ,छाया आण्णा काबळे ५०२ ,मनोज राजेंद्र गुरव ३८६ तर महादेवी सोमनाथ बेद्रे या बिनविरोध निवडून आल्या आहेत.

बातम्या आणखी आहेत...