आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामैलारपूर येथील श्री खंडोबा मंदिरात रविवारी (दि.११) ‘येळकोट येळकोट जय मल्हार’चा जयघोष करत शेकडो भाविकांनी श्री खंडोबाचे दर्शन घेतले. नळदुर्ग (मैलारपूर) हे खंडोबाचे मुळ ठिकाण आहे. पावणेदोन महिन्यांच्या वास्तव्यासाठी खंडोबा देव येथे आल्यावर दर रविवारी येथे दर्शनासाठी भाविकांची गर्दी होते. ६ जानेवारी २०२३ रोजी खंडोबाची यात्रा भरणार आहे.
यावर्षी दोन वर्षानंतर खंडोबाची यात्रा भरत आहे त्यामुळे यात्रेत हजारो भाविक उपस्थित राहण्याची शक्यता आहे. गर्दी टाळण्यासाठी काही भाविक आताच रविवारी खंडोबाचे दर्शन घेण्यासाठी मैलारपुरात गर्दी करत आहेत. रविवारी (दि.११) श्री खंडेरायाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. पहाटेपासूनच भाविकांनी दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या.
यावेळी देवाला दंडवत घालणे, खोबरे-भंडारा उधळणे, नैवेद्य दाखविणे याबरोबरच नवस फेडण्याचे कार्यक्रमही मंदिर परिसरात सुरू होता. भाविकांना याठिकाणी रांगेत व्यवस्थित दर्शन व्हावे, यासाठी नळदुर्ग पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक सिद्धेश्वर गोरे यांनी मंदिरात पोलिस बंदोबस्त ठेवला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.