आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आंतरराष्ट्रीय योगा दिन:उस्मानाबादेत ठिकठिकाणी योगदिन; शिबिरात 35 पोलिस कर्मचाऱ्यांचे रक्तदान

उस्मानाबादएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

शहरासह जिल्ह्यात विविध शाळा, शासकीय कार्यालये व नागरिकांच्या वतीने मंगळवारी योग दिनानिमित्त कार्यक्रम घेण्यात आले. पहाटेच्या वेळी सर्वत्र योगासने करताना दिसून आले. पोलिस प्रशासनाने घेतलेल्या रक्तदान शिबिरात ३५ पोलिस कर्मचाऱ्यांनी रक्तदानही केले.

आंतरराष्ट्रीय योगा दिनाच्या निमित्ताने जिल्हा परिषदेत आयुष विभागाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात उच्च रक्तदाब, मधुमेह, स्थुलता, थायराईड, मनोविकार, सांध्याचे विकार तसेच सध्याच्या जीवनशैलीमुळे निर्माण झालेले अनेक आजार कमी करण्यासाठी योग शिकवण्यात आले.

पोलिस दलातर्फे रक्तदान, ३५ बाटल्या संकलित
उस्मानाबाद जिल्हा पोलिस दलात पोलिस मुख्यालय, पोलिस उपविभागीय कार्यालये व सर्व पोलिस ठाणी स्तरावर योग दिन साजरा करण्यात आला. तसेच या निमीत्ताने उस्मानाबाद पोलिस व बार्शी येथील शहा रक्तपेढी यांच्या संयुक्त विद्यमाने पोलिस मुख्यालयातील अलंकार सभागृहात रक्तदान शिबिराचेही आयोजन करण्यात आले. या शिबिरात पोलिस अधिकारी, अंमलदार यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला यात ३५ बाटल्या रक्त संकलित झाले.