आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासतत दुष्काळ, पावसाचा असमतोल तसेच इतर नैसर्गीक आपत्तीमुळे जिल्ह्यातील खचलेल्या शेतकऱ्यांसमोर शिराढोण (ता.कळंब) येथील युवा व प्रयोगशील शेतकरी सुभाष कल्याण माकोडे यांनी एक आदर्श निर्माण केला. त्यांनी एका वर्षात सलग दोन वेळा १२ एकरात टोमॅटो लागवड करत दुसऱ्यांदा तब्बल दीड कोटी रुपयांचे उत्पन्न घेतले. त्यामूळे वर्षभरातील त्यांचे अडीच काेटी रुपयांचे उत्पन्न झाले.
सुभाष माकोडे व शरद माकोडे या बंधूंनी अथक परिश्रमातून परिसरात शेती क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटवला आहे. शिराढोण येथील युवा शेतकरी सुभाष यांना वडिलोपार्जित ३० एकर शेती आहे. २०१६ पासून यांनी पारंपारीक पीक पद्धतीस फाटा दिला. शेतात वेगवेगळे प्रयोग करत टोमॅटो, कारले, टरबूज आदी भाजीपाला शेतीतून उत्पन्न घेतले. सात वर्षाच्या अनुभवाच्या जोरावर त्यांनी गतवर्षी ऑगस्ट महिन्यात १२ एकरवर टोमॅटोची लागवड केली. या उत्पादनातून त्यांना नोव्हेंबर व डिसेंबर २०२१ मध्ये एक कोटींचे उत्पन्न मिळाले. भरघोस उत्पन्नामुळे माकोडे बंधूंचा आत्मविश्वास वाढलाच, मोठे भांडवलही मिळाले. त्यानंतर त्यांनी हा प्लॉट संपताच लगेच पुन्हा त्याच १२ एकर क्षेत्रावर टोमॅटोची लागवड केली. आज रोजी माकोडे यांचा टोमॅटो बाजारात दाखल झाला असून आत्तापर्यंत या दुसऱ्या लाॅटमधून त्यांना दीड कोटींचे उत्पन्न मिळाले आहे. या लॉटमधील टोमॅटो विक्री अद्यापही सुरुच असून आणखीन किती उत्पन्न हाेइल, याचे गणित येणारा काळच ठरवेल.
नियोजनबद्ध सहा एकरामध्ये प्लॉट लागवड
बाजारपेठेच्या अंदाजानुसार सहा एकरात मार्च महिन्यात टोमॅटो लावले. आता फेब्रुवारी महिन्यातील टोमॅटो बाजारात आला. नंतर मार्च महिन्याचा टोमॅटो बाजारात येईल. लागवडीसाठी मोठया प्रमाणात मजूर लागतात. काढणीच्या वेळी रोजंदारीवर मजुरी न देता जेवढे काम तेवढे दाम या तत्वावर त्यांनी मजुरांना रोजगार देत आहेत. सध्या एका कॅरेटला २० रुपये मजूरी देतात. त्यामूळे एक मजूर ५०० ते ८०० रुपये दिवसाला मजूरी मिळवतात.
इतर शेतकऱ्यांनाही उत्पादन
माकोडे यांनी गावातील इतर शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत लागवडीस प्रोत्साहित केले. यामध्ये येथील श्रीकांत माकोडे, ज्ञानेश्वर गुंड तसेच श्रीपाद कापसे यांनीही थोडया फार प्रमाणात टोमॅटो लागवड करत लाखोंचे उत्पन्न घेतले आहे.
बाजारपेठेनुसार लागवड
बाजारपेठेचा अंदाज घेत लागवड करतो. त्यानुसार यंदा दोन्ही प्लॉट मधून मला अडीच कोटींचे उत्पन्न मिळाले आहे. आणखीनही बाजारभाव चांगलाच असून टोमॅटो विक्री सुरुच आहे.
सुभाष माकोडे, शेतकरी, शिराढोण.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.