आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुणवत्तावाढीसाठी प्रोत्साहन:आयुष्यामध्ये यशस्वी होण्यासाठी युवकांनी संधीचा उपयोग करावा; सहायक पोलिस अधीक्षक एम.रमेश यांचे आवाहन

डिकसळ2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जीवनात यश मिळवायचे असेल तर युवकांनो स्वतःला झोकून देऊन अभ्यास करा. मेहनत करणाऱ्यालाच यश मिळते. त्यामुळे आयुष्यात आलेल्या सुवर्णसंधी डावलू नका असे आवाहन सहाय्यक पोलिस अधीक्षक एम रमेश यांनी रुरल टॅलेंट हंट च्या समारोपप्रसंगी केले.

दरम्यान जिल्हाधिकारी यांनी ज्यावेळी शिबिराला भेट दिली त्यावेळी त्यांनी ही अशा अनोख्या शिबिराचे कौतुक केले व जिल्हास्तरावर आदेश देऊन प्रत्येक तालुक्यात अशा प्रकारचे शिबिर घ्यायचा निश्चय केला आहे. अशी महिती श्री.रमेश यांनी यावेळी दिली. व्यासपीठावर पोलीस निरीक्षक यशवंत जाधव, प्राचार्य डॉ सुनील पवार, पोलीस उपनरीक्षक अमोल मालुसरे, गजानन पुजरवाड आदींची उपस्थिती होती. शिबिरात घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण ही करण्यात आले शिवाय शिबिराप्रसंगी परिश्रम घेतलेल्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचे प्रशस्ती पत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

यादरम्यान आयोजित रक्तदान शिबिरास १२५ जणांनी रक्तदान केले. पोलीस उपनिरीक्षक अमोल मालुसरे, गजानन पुजरवाड, पोलीस कॉन्स्टेबल नवनाथ खांडेकर, कॉन्स्टेबल रवी साळुंखे, हेडकॉन्स्टेबल सचिन गायकवाड, कॉन्स्टेबल दत्तात्रय थाटकर, होमगार्ड आंनद रणदिवे, अमोल गायके, दिनेश पुरी, किरण अंभोरे यांचाही प्रशस्ती पत्र देऊन सन्मानित करण्यात आले.उपविभागीय पोलिस कळंब च्या वतीने ता.२ ते ता.८ दरम्यान शहरानजीक असलेल्या डिकसळ येथील मोहेकर क्रीडा संकुल येथे आयोजित केले होते. शिबिरात जवळपास दीडशे युवक व युवतींनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला होता. शिबिरासाठी सहकार्य करणाऱ्या सर्वांचा यावेळी सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा जगदीश गवळी यांनी केले तर आभार यशवंत जाधव यांनी केले.

समारोप दिवशी एम.रमेश यांनी शिबिरार्थींना मार्गदर्शन करताना म्हणाले की, शिबिरादरम्यान मिळालेले संपूर्ण बौद्धिक व शारीरिक ज्ञान कायम लक्षात ठेऊन ध्येय पूर्ण करा, नेहमी आमच्या संपर्कात रहा, वारंवार तुम्हाला मार्गदर्शन केले जाईल. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यासाठी हा एक प्लॅटफॉर्म द्यायचा होता , एक संधी द्यायची होती म्हणून मी आटोकाट प्रयत्न करून शिदोरी देत आहे. त्यामुळे समाजात एक चांगले नागरिक बना. धीर न खचता यश गाठा. मी कोठेही असलो तरी तुम्हाला यश मिळाल्यावर मला निश्र्चित कळवा म्हणजे या शिबिराचे खऱ्या अर्थाने सार्थक होईल असेही मत व्यक्त केले.

बातम्या आणखी आहेत...