आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिक्षकांना प्रतिमा भेट देऊन स्वागत:तुळजापूर खुर्द नगरपालिका शाळेत ‘आपली शाळा, आपले गुरुजी’ उपक्रम

तुळजापूर25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

वर्गात वर्ग शिक्षकाची प्रतिमा लावण्याचा राज्य सरकारच्या “आपली शाळा आपले गुरुजी” या उपक्रमाचा तुळजापूर खुर्द येथील नगर पालिका शाळेत प्रारंभ करण्यात आला आहे. तुळजापूर खुर्द येथील तुळजाई मंडळाने शिक्षक दिना निमित्त सर्व शिक्षकांची प्रतिमा शाळेला भेट देऊन सत्कार केला आहे.

शिक्षक दिनाचे औचित्य साधून तुळजाई गणेश मंडळाचा वतीने नगर पालिका शाळेतील शिक्षकांचा माजी नगराध्यक्ष सचिन रोचकरी, मुख्याधिकारी अरविंद नातू, माजी नगरसेवक पंडीतराव जगदाळे, मंजुषा देशमाने आदी मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी तुळजाई मंडळाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर साबळे, उपाध्यक्ष सुरज जगदाळे, सचिव विकास भोजने यांचा सह तुळजाई मंडळाचे संस्थापक अध्यक्ष आदिनाथ ठेले, तुळजाई नागरी सहकारी संस्थेचे चेअरमन राजाभाऊ देशमाने आदींची उपस्थिती होती.शाळेचे मुख्याध्यापक तुकाराम मोटे, अशोक शेंडगे, जालिंदर राऊत, बालाजी साळुंके, सतीश यादव, रविकुमार पवार, अंगणवाडी शिक्षिका लक्ष्मीबाई भोसले, अंगणवाडी मदतनीस रेणुका जाधव, शिक्षिका उषा धाकतोडे, अंगणवाडी मदतनीस रेश्मा सावंत यांना त्यांच्याच प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला.

बातम्या आणखी आहेत...