आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामाळीवाडा येथील ३२ वर्षीय शंकर वंसत साठे (रा. माळीवाडा झोपडपट्टी) या तरुणाने राहत्या घरी छताच्या लाकडी बांबूला मफलरच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना १२ डिसेंबर राेजी उघडकीस आली. शंकर माळीवाड्यात आई-वडील, पत्नी, मुलगा, मुलीसाेबत राहत होता. कंटेनर डेपो येथे काम करत होता. माळीवाड्यातील पोलिस पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, ११ डिसेंबरला शंकरने रात्री घरी आल्यावर पत्नीसह मुलांना घराबाहेर काढले हाेते. त्यानंतर ते शेजारच्या नातेवाइकांकडे झाेपण्यासाठी गेले.
दुसऱ्या दिवशी १२ डिसेंबरला सकाळी वडिलांनी दरवाजा ठाेठावला. मात्र, प्रतिसाद मिळत नसल्याने त्यांनी खिडकीतून डोकावून पाहिले असता, शंकर गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. घटनेची माहिती मिळताच दौलताबाद पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक दिलीप बचाटे, राठोड आदींनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर दरवाजा तोडून शंकरला तत्काळ घाटीत नेले. मात्र, डाॅक्टरांनी तपासून मृत घोषित केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.