आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपघात:अंबर प्लाझासमोर अपघातात तरूणाचा मृत्यू

नगर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

रस्ता अपघातात तरूणाचा मृत्यू झाला आहे. अक्षय ज्ञानदेव कुसळकर (वय ३२, रा. श्रमिकनगर, नगर) असे मयत तरूणाचे नाव आहे. कुसळकर यांचा २५ नोव्हेंबर रोजी सव्वा नऊ वाजेच्या सुमारास अंबर प्लाझासमोर अपघात झाला होता.

त्यांना उपचारासाठी येथील जिल्हा रूग्णालयात दाखल केले होते. अक्षय कुसळकर यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू असताना त्यांचा बुधवार ३० नोव्हेंबर रोजी मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यावरून कोतवाली पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास पोलिस अंमलदार सलीम शेख करीत आहेत.

बातम्या आणखी आहेत...