आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपघात:वाहनांच्या धडकेत युवकाचा मृत्यू‎

ढोकी‎ ‎9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

चालत्या उसाच्या ट्राॅलीला‎ धडक दिल्याने चारचाकी‎ गाडीचा चालक मृत्यूमुखी‎ पडल्याची घटना शुक्रवारी‎(दि.१०) रात्री ९ वाजेच्या ‎सुमारास ढोकी ते कळंब‎ रोडवर घडली.‎ माहितीनुसार कळंब तालुक्यातील माळकरंजा‎ येथील संतोष सुरेश तुपसौंदरे (३३) हा युवक‎ चारचाकी गाडी (एम एच- १२- बी व्ही-९१४४)‎ चालवत ढोकीकडे येत होता. त्यावेळी ढोकी‎ नजीक ऊस कारखान्याकडे ऊस घेऊन जात‎ असलेल्या ट्राॅलीवर मागून धडकला.

अपघातात‎ संतोष यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर‎ परिसरातील नागरिक घटनास्थळी धावून आले.‎ त्यांनी ढोकी पोलिस ठाण्याला माहिती देताच‎ ढोकी पोलिस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी‎ घटनास्थळी धाव घेतली.‎

बातम्या आणखी आहेत...