आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुटुंबियांचा शोध:अनाेळखी मनाेरूग्ण महिलेस युवकांची मदत ; आई मुलीचे भेट घालुन घडविले माणुसकीचे दर्शन

कळंबएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

मनोरुग्ण असणारी एक महिला शहरात फिरत होती. गाव कोठे आहे हे व्यवस्थित सांगता येत नव्हते, कुठलीही माहिती नाही, अशा कठीण परिस्थितीत शहरातील दोन युवकांनी त्या महिलेच्या कुटुंबियांचा शोध घेऊन मुलीला तिच्या आईकडे पाठवुन देऊन माणुसकीचे दर्शन घडवले आहे.कळंब येथील बस स्थानकावर एक मुलगी फिरत होती. ही महिला कोणालाही पैसे मागायची, कोणालाही खायला मागायची. मात्र काही तिचा फायदा घेत तिची छेडछाड करत असत. हीच बाब कळंब येथील विजय कदम यांना सामजिक कार्यकर्ते अमर चाऊस यांना सांगितली.

चाऊस यांनी दयावान प्रतिष्ठानचे अध्यक्ष इम्रान मुल्ला यांना सोबत घेऊन त्या महिलेची विचारपूस केली असता, ती सांगत तर खूप काही होती पण समजत काहीच नव्हते. एकदा सांगायची हैद्राबाद सासर आहे, आणि माहेर कळंब पण कोणते कळंब ते सांगत नव्हती. आणि माझे गाव जवळच आहे. शेवटी अंगठ्याचे ठसे घेऊन आधार कार्डावरून पत्ता शोधायचा असे ठरले पण या प्रयत्नांचा काही उपयोग झाला नाही.कॅरीबॅगमधील सामानावरून कापड दुकानातील त्या कपड्याच्या दुकानदाराला कॉल केला व माहिती घेतली असता त्या मुलीला आई आहे.

तद्नंतर अमर चाऊस व सहकारी यांनी पोलीस स्टेशन मध्ये जाऊन घडलेला प्रकार सांगितला. पोलिसांनी लागलीच सर्व चक्रे फिरवली आणि त्या महिलेच्या आईचा संपर्क झाला. दुसऱ्या दिवशी त्या महिलेलस तिच्या आई जवळ हुसनापूर ता. कळंब, जिल्हा यवतमाळ येथे पाठविले. आपल्या कुटुंबियांना पाहताच तिला आनंद झाला व तिने हात जोडून आभार मानले. सामाजिक कार्यकर्ते अमर चाऊस, दयावान प्रतिष्ठान चे अध्यक्ष इम्रान मुल्ला, सर्पमित्र इरफान शेख, चंद्रकात चंदनशिवे,कळंब पोलीस स्टेशन चे हवालदार खामकर यांनी मदत केली.

बातम्या आणखी आहेत...